बागपिंपळगावाजवळील सर्व्हिस रोडवर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:41 AM2021-09-16T04:41:24+5:302021-09-16T04:41:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर या रस्त्याचे आता चौपदरीकरण झाल्यानंतर हा रस्ता क्रमांक ५२ झाला आहे. ...

Pits on Service Road near Bagpimpalgaon | बागपिंपळगावाजवळील सर्व्हिस रोडवर खड्डे

बागपिंपळगावाजवळील सर्व्हिस रोडवर खड्डे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर या रस्त्याचे आता चौपदरीकरण झाल्यानंतर हा रस्ता क्रमांक ५२ झाला आहे. हा रस्ता आय.आर.बी.ने केला आहे. या महामार्गावरील बागपिंपळगावाजवळील सर्व्हिस रोडवर काही महिन्यांतच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मुख्य रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र आहे.

या रस्त्यावरून सुविधा कमी मात्र, जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांकडून पाडळसिंगी टोल नाक्यावर जोरात टोलवसुली केली जात आहे. हा पूर्वीचा धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग होता. त्यानंतर, या रस्त्याचे आयआरबीकडून चौपदरीकरण करण्यात आले. सुरुवातीला हा रस्ता एकदम चांगला दिसत होता. मात्र, काही वर्षांतच या झालेल्या रस्त्यावरील बागपिंपळगावाजवळील सर्व्हिस रोड करण्यात आला. मात्र, काही महिन्यांतच हा सर्व्हिस रोड जागोजागी खचला आहे. त्यात पावसाचे पाणी साचून आणखी घाण झाली आहे. मुख्य रस्त्यावरही अनेक जागांवर खड्डे पडले आहेत, तर अनेक सर्व्हिस रोडवरील जाळ्यावर कपडे वाळत घालणे, जनावरे बांधण्यासाठी उपयोग होताना दिसत आहे. अनेक ठिकाणच्या लाइट बंद पडल्या आहेत. या रस्त्यावर सुविधा कमी मात्र राष्ट्रीय प्राधिकरणाकडून टोलवसुली मात्र जोरात सुरू आहे, तरी हा खचलेला रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

...

बागपिंपळगावाजवळील सर्व्हिस रोडवर पडलेले खड्डे बुजविण्यात येतील. जे नागरिक त्या जाळीला जनावरे बांधत असतील, तर त्यांना काढण्याचे आदेश देण्यात येतील, असे आयआरबीचे प्रवीण नागपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

...

150921\15bed_2_15092021_14.jpg

बागपिंपळगाव जवळील सर्व्हिस रोडवर खड्डे

Web Title: Pits on Service Road near Bagpimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.