शिरूर, सिंदफना रस्त्यावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:13+5:302021-05-07T04:35:13+5:30
शिरूर कासार : शिरूर सिंदफना ते जाटनांदूर या रस्त्याची खड्ड्यामुळे दुर्दशा झाली असुन त्याचा सर्वांनाच त्रास ...
शिरूर कासार : शिरूर सिंदफना ते जाटनांदूर या रस्त्याची खड्ड्यामुळे दुर्दशा झाली असुन त्याचा सर्वांनाच त्रास भोगावा लागत आहे ,या रस्त्यावरून जवळपास दहा ते पंधरा गावची सतत रहदारी असते ,खड्ड्यामुळे रूग्णांना फार त्रास होत असल्याने या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे .
मंदिरातले टाळ मृदंग मुके झाले
शिरूर कासार : कोरोना मुळे मंदिराचे दरवाजे बंद झाले तर नित्य नैमित्तिक भजन देखील बंद झाल्याने टाळ आणि मृदंग मुके झाल्यागत दिसून येते .
भजन बंद असल्याने अभंगाचाही विसर पडू लागल्याचे बोलले जात आहे .
प्रेम आणि आपुलकीचा विसर
शिरूर कासार : कोरोना महामारीच्या नियमावली मुळे आणि संसर्गाच्या भितीपोटी मानसं दुरावली गेली आहे ,सुख दुःखाला एकत्रीत येणारे नातेवाईक आता जागेवरच डांबुन ठेवल्याने प्रेम आणि आपुलकिचा विसर पडू लागल्याचे भयावह चित्र कोरोनाने निर्माण केले आहे
फुलांच्या बागेवर कोरोनाची आळी
शिरूर कासार : फुलशेतीतून उत्पादन घेण्याच्या हेतुने शेतात लावलेली फुलशेती फुलांनी बहरली असली तरी सध्या सर्व धार्मिक,सामाजिक ,राजकिय असे कार्यक्रम बंद तर मंदिर देखील बंद असल्याने फुलबागेला कोरोनाची आळी लागली असल्याचे चित्र दिसत असून फुल तोडून फेकून द्यावे लागत आहे .
चैत्र महिन्यातील जत्रा व कुस्त्यांचे आखाडे झाले बंद
शिरूर कासार : चैत्र महिना सुरू झाला की गावोगावी ग्रामदैवताच्या जत्रा भरत असत शिवाय कुस्त्या देखिल होत असायच्या मात्र याही वर्षी कोरोना संक्रमन सुरूच असल्याने जत्रेतील रेवडी, फुटाने ,आणि रहाट पाळणे खेळताना मिळणारा लहाण मुलांचा आनंद हिरावला गेला तर महागडा खुराक खाऊन दंड बैठका जोर काढत कुस्ती जिंकण्याची उमेद ठेवलेले पहिलवानांना देखील लंगोट लावता आला नाही .
लिंबाच्या झाडाला निंबोळ्याचे घोस
शिरूर कासार : चैत्र महिन्यात सर्वच वनराई पानगळ होऊन नवी पालवी धारण करत असते ,आंब्याबरोबर लिंबालाही मोहर लागत असतो ,गुढीला लिंबाचा तौर ,त्यात थोडी चिंच आणि गुळ असा गोड, कडू, आंबट रसस्वाद आरोग्यवर्धक मानला जातो ,आता आंब्याला जशा कै-या तशाच लिंबाच्या झाडाला देखील निंबोळीचे घड लगडलेले दिसून येत आहे .