कृषी विभागाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:43+5:302021-04-17T04:33:43+5:30
कडब्याचे दर वाढले अंबाजोगाई : तालुक्यात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी कडबा विक्रीसाठी काढला आहे. यावर्षी कडब्याचे भाव मोठ्या प्रमाणात ...
कडब्याचे दर वाढले
अंबाजोगाई : तालुक्यात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी कडबा विक्रीसाठी काढला आहे. यावर्षी कडब्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कडब्याची एक पेंढी २० ते ३० रुपये दरांपर्यंत विकली जाते. पावसाळ्यापूर्वीच चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक पशुपालक महागड्या दराने कडब्याची खरेदी करू लागले आहेत. ज्वारीचा पेरा कमी झाल्याने कडब्याचे भाव वाढले आहेत.
अनुदानात वाढ करण्याची मागणी
अंबाजोगाई : निराधारांना शासनाकडून दर महिन्याला अत्यल्प अनुदान दिले जाते. दिले जाणारे हे अनुदान अत्यंत कमी प्रमाणात आहे. महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानातही वाढ करण्यात यावी. तसेच सध्या कोरोनाच्या काळात कामे उपलब्ध नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा लाभार्थींच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. सुभाष शिंदे यांनी केली आहे.
शीतपेयांच्या मागणीत मोठी वाढ
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून थंडावा मिळावा यासाठी शीतपेयांची मागणी वाढली आहे. परिणामी शीतपेयी विक्रीचा व्यवसायही जोमात सुरू आहे. लिंबूसरबत, ताक, लस्सी, मठ्ठा या पारंपरिक शीतपेयांना अधिक मागणी आहे.
रमजानवर कोरोनाचे सावट :
अंबाजोगाई : मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी रमजानवर कोरोनाचे सावट आहे. इतरवेळी रमजानच्या काळात धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधीत बाजार पेठेलाही मोठी चालना मिळते. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शासनाने रमजान महिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.