भोपा शाळेत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:28+5:302021-07-16T04:24:28+5:30

तेलगावपासून जवळच असलेल्या भोपा ता. धारूर येथील जि.प. प्राथमिक शाळेत सतत कोणते ना कोणते विद्यार्थी हितावह उपक्रम राबविण्यात येतात. ...

Plantation at Bhopa School | भोपा शाळेत वृक्षारोपण

भोपा शाळेत वृक्षारोपण

googlenewsNext

तेलगावपासून जवळच असलेल्या भोपा ता. धारूर येथील जि.प. प्राथमिक शाळेत सतत कोणते ना कोणते विद्यार्थी हितावह उपक्रम राबविण्यात येतात. नव्यानेच आलेल्या बालाउपक्रमा अंतर्गतही विविध उपक्रम राबविण्यात आले. बुधवार, १४ जुलै रोजी धारूरचे गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अंडिल यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमास धारूरचे केंद्र प्रमुख सय्यद हकिम, केंद्र प्रमुख दत्तात्रय कोकणे, तेलगावचे केंद्र प्रमुख नामदेव राठोड, केंद्रीय मुख्याध्यापक ए.आर. तिडके, गांधले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाझीम शेख, युवा कार्यकर्ते कल्याण वाघचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी ग.शि. गिरी म्हणाले, झाडांपासून अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे झाडांपासून मिळणारा ऑक्सिजन शरीरासाठी खूपच लाभदायक असून, ऑक्सिजन लेवल वाढण्यास मदतही होते. त्यामुळे वृक्षलागवडीस महत्त्व देऊन, त्याची जोपासनाही करावी. याप्रसंगी भोपा शाळेचे मुख्याध्यापक जी.के. तिडके यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांचा मुख्याध्यापक तिडके व इतरांनी सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक तिडके यांच्यासह सोनटक्के, किरवले, खटाणे, बोथीकर आदींनी परिश्रम घेतले.

150721\img-20210715-wa0116.jpg

भोपा जि प शाळेत अटल घनवन अंतर्गत वृक्षारोपन

Web Title: Plantation at Bhopa School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.