पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:46+5:302021-06-06T04:25:46+5:30

बीड : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी जिल्ह्यातील पालवण तेथील सह्याद्री देवराई वनक्षेत्रात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण ...

Plantation at various places on the occasion of Environment Day | पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण

Next

बीड : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी जिल्ह्यातील पालवण तेथील सह्याद्री देवराई वनक्षेत्रात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार शिरीष वमने, वनक्षेत्रपाल अमोल मुंढे आणि वनपाल दिगंबर फुंदे आणि सरपंच नजानताई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी जगताप आणि उपस्थितांनी सह्याद्री देवराई परिसरातील घनदाट वृक्षलागवडीतील भरघोस वाढ झालेल्या वृक्षवाटिकेची पाहणी केली, तसेच वृक्ष संमेलनाच्या वेळी लागवड केलेल्या (संमेलनाध्यक्ष ) वडाच्या झाडास भेट देऊन त्याचीदेखील पाहणी केली. त्यांनी सह्याद्री देवराई येथील लागवड केलेल्या व सध्या असलेल्या वनक्षेत्राची माहिती घेऊन तेथील वनराई अधिक बहरावी यादृष्टीने सूचना केल्या. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सुभाष मस्के, वनरक्षक शंकर शिंदे, वनरक्षक कृष्णा जगताप यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक व्यक्ती तीन झाडे ही मोहीम राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेचा शनिवारी शुभारंभ झाला.

प्राथमिक शाळेत लावली झाडं

पालवण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि सरपंच यांच्यासह उपस्थित अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य सुभाष मस्के आदींनी वृक्षारोपण केले. यावेळी पालवण ग्रामपंचायतींचे कर्मचारी उपस्थित होते.

रामगडावर वृक्षांचे होणार जतन

नामलगाव परिसरातील रामगड देवस्थान येथील दंडकारण्यमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, रामगड देवस्थानचे प्रमुख अमोल महाराज तथा स्वामी योगीराज, श्री बंकट्स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अरुण दैतकार आणि प्रा बी. डी. मेंगडे उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन श्री बंकट्स्वामी महाविद्यालयाच्या वतीने दंडकारण्य परिसरातील वृक्षलागवडीसाठी पूर्वतयारी करण्यात आली होती. यावेळी एनएसएसचे विद्यार्थी, यूथ फोर फ्युचर आणि यूथ फोर नेशनचे सदस्य युवक-युवतीदेखील उपस्थित होते. दंडकारण्य परिसरात २१०० विविध प्रजातींची वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यामध्ये आंबा -चिंच यासह ५३ विविध प्रकारची झाडे असतील. येथील वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी या सर्वांनी घेतली असून लागवडीसाठी ठिबक सिंचनासाठी रोटरी क्लब साहाय्य करणार आहे.

===Photopath===

050621\05_2_bed_23_05062021_14.jpg~050621\05_2_bed_22_05062021_14.jpeg

===Caption===

पर्यावरण दिनामित्त वृक्षलागवडीत सहभागी झालेले एनसीसीचे विद्यार्थी तसेच यूथ फोर नेशनचे सदस्य युवक-युवती यांनी सहभाग घेतला होता. ~सह्याद्री देवराई येथील वृक्षारोपण झाल्यानंतर पालवन येथील जि.प.प्राथिमिक शाळेत वृक्षारोपण करताना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर, नामदेव टिळेकर, तहसिलदार शिरीष वमणे व ग्रामस्थ 

Web Title: Plantation at various places on the occasion of Environment Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.