दहा दिवसांत धारूर परिसरात २० हजार बीजगोळ्यांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:50+5:302021-07-10T04:23:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : नगर परिषद व बालाघाट प्रतिष्ठानच्या वतीने वसुंधरा मित्रमंडळाच्या सहकार्याने दहा दिवसांत २० हजार बहावा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : नगर परिषद व बालाघाट प्रतिष्ठानच्या वतीने वसुंधरा मित्रमंडळाच्या सहकार्याने दहा दिवसांत २० हजार बहावा या वृक्षाच्या बीजगोळ्यांचे रोपण करण्यात आले. बीजगोळ्यांचे रोपण करणारी धारूर नगर परिषद जिल्ह्यात पहिली ठरली आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. या मोहिमेचा समारोप शुक्रवारी झाला.
वृक्ष संवर्धन चळवळ सर्वत्र जोमाने सुरू आहे. वृक्षारोपणाबरोबर धारूर नगर परिषदेने वेगळा उपक्रम बालाघाट प्रतिष्ठानच्या वतीने व वसुंधरा मित्रमंडळाच्या सहकार्याने धारूर शहर व परिसरात राबवला जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते बीजारोपण करून करण्यात आला. बहावा या वृक्षाचे २० हजार बीजगोळे तयार करण्यात आले होते. या गोळ्यांचे रोपण दहा दिवस रोज दोन हजार असे केले. धारूरला जोडणाऱ्या रस्त्यांवर याचे रोपण केेले. शहरालगत असणाऱ्या डोंगरावरही या बीजगोळ्याचे रोपण करण्यात आले.
नगराध्यक्ष डाॅ. स्वरूपसिंह हजारी यांच्या हस्ते या मोहिमेचा समारोप करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी नितीन बागूल, बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक सचिन दुबे, संतोष सिरसट, चोखाराम गायसमुद्रे, दत्तात्रय धोतरे, ॲड. मोहन भोसले, सुरेश लोकरे, वसुंधरा मित्रमंडळाचे रोहन हजारी उपस्थित होते. यावेळी वसुंधरा मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते, नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
090721\img-20210709-wa0022.jpg
धारूर नगरपरिषदेच्या शहरातील रस्त्यांवर व परिसरातील डोंगरावर २० हजार बिजगोळ्यांचे रोपण केले.