वृक्षारोपण काळाची नसून, श्वासाची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:27+5:302021-06-06T04:25:27+5:30
: राष्ट्रीय छात्र सेनेचे मिशन ऑक्सिजन अभियान अंबाजोगाई : वृक्षारोपण ही काळाचीच गरज नसून, ती ...
: राष्ट्रीय छात्र सेनेचे मिशन ऑक्सिजन अभियान
अंबाजोगाई : वृक्षारोपण ही काळाचीच गरज नसून, ती जीवन जगण्यासाठी श्वासाची गरज बनली आहे. वृक्षारोपण चळवळ गतिमान होऊन जागोजागी ऑक्सिजन पार्क निर्माण होणे हीच खरी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने राष्ट्रीय छात्र सेनेच्यावतीने ५ जून ते १७ सप्टेंबरपर्यंत ‘मिशन ऑक्सिजन’अंतर्गत महावृक्षलागवड अभियान चालणार आहे. यामध्ये एक हजार वृक्ष लागवड व त्याचे संगोपन करण्याचा संकल्प अंबेजोगाई विभागाच्यावतीने करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे सचिव व्यास यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
याप्रसंगी अभियानाचे संयोजक मेजर एस. पी. कुलकर्णी, शिवकुमार निर्मळे, डॉ. लेफ्टनंट राजकुमार थोरात उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंजुषा मिसकर म्हणाल्या, राष्ट्रीय छात्र सेना ही शिस्तप्रिय संघटना आहे. त्यांनी हाती घेतलेले ‘मिशन ऑक्सिजन’ हे यशस्वी होणारच आहे. आज मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीची गरज आहे. झाडांच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळतो. मग ते घरासमोर अंगणामध्ये, शेतात शाळा-महाविद्यालयात कुठेही असले, तरी ऑक्सिजनचा साठा असणे गरजेचे आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे सचिव व्यास म्हणाले की, प्रत्येक शाळा व महाविद्यालयाने या अभियानात सहभागी व्हावे. कारण आम्ही संस्थेच्या परिसरातील ऑक्सिजन पार्क, शहीद स्मृती उद्यान यामध्ये मोठ्या संख्येने झाडे लावली म्हणून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती झाली. कार्यक्रमानंतर मन्यवरांसह कॅप्टन साधना चामले, संचालक संतोष चौधरी, वैभव चौसाळकर, प्रकाश आकुसकर, प्रकाश गोस्वामी, कॅडेट प्रवीण जाधव, रवींद्र मुंडे, नम्रता सरवदे, अक्षदा वेल्दे, आदित्य थोरात, किरण पाटेकर, गार्गी दीक्षित यांनी संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण केले.
===Photopath===
050621\avinash mudegaonkar_img-20210605-wa0031_14.jpg