फ्लड झोनमध्येही प्लाॅटिंग; माजलगाव शहराला भूमाफियांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 01:46 PM2020-12-12T13:46:02+5:302020-12-12T13:46:55+5:30

या गोरखधंद्यात  भूमाफियांनी शहरालगत असणाऱ्या नदीपात्राशेजारी फ्लल्ड झोनमध्ये प्लॉटिंग पाडणे सुरू केले आहे.

Plating even in flood zones; Land mafia to the city of Majalgaon | फ्लड झोनमध्येही प्लाॅटिंग; माजलगाव शहराला भूमाफियांचा विळखा

फ्लड झोनमध्येही प्लाॅटिंग; माजलगाव शहराला भूमाफियांचा विळखा

googlenewsNext
ठळक मुद्देएनए, लेआऊटविना प्लॉटिंग खरेदी विक्रीचे व्यवहार सुरूपाच जणांना तहसीलदारांनी बजावली नोटीस

माजलगाव : माजलगाव शहराचा वाढता विस्तार पाहता शहरालगतच्या जमिनीला भूमाफियांनी विळखा घातला आहे. करोडो रुपयांची उलाढाल होत असलेल्या या व्यवहारात कृषी जमिनींवर अनधिकृत प्लॉटिंग काढून विना एनए लेआउट ग्राहकांना फसवण्याचा गोरखधंदा याठिकाणी जोरात सुरू आहे.

या गोरखधंद्यात  भूमाफियांनी शहरालगत असणाऱ्या नदीपात्राशेजारी फ्लल्ड झोनमध्ये प्लॉटिंग पाडणे सुरू केले आहे.   अशा स्थितीत आकर्षक बॅनरबाजी करून ग्राहकांना भुरळ पाडणाऱ्या भूमाफियांकडून फ्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी आवश्यक ती कागदपत्रे पाहण्याची गरज आहे.
विकसित होणाऱ्या माजलगाव शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने याठिकाणी रस्त्यालगत येणाऱ्या जमिनींना करोडोचा भाव आला आहे. त्यामुळे भूमाफियांचा विळखा शहराला घट्ट पकडत चालला आहे. शहरालगत केसापूर येथील  गट क्रमांक १२ मध्ये (पंढरी पार्कनगर) माजलगाव सिंधफणा नदी फ्लड झोन परिसरात, गट क्रमांक २०१ मध्ये (गोविंद यशवंतनगर) कृषीयोग्य जमिनीवर अनधिकृतपणे प्लॉटिंग पाडली जात आहे.

विनालेआउट पाडल्या जात असलेल्या या प्लॉटिंगमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ५०, २० फुटांचे रस्ते, पाणी सुविधा, शाळा-कॉलेजसाठी जागा, एलईडी लाईट इत्यादी आमिषे दाखवली जात आहेत. वास्तविक पाहता सदरील ठिकाणी निवासी व वाणिज्य प्रयोजनासाठी शासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. असाच प्रकार शहरालगत इतर ठिकाणी जोरात सुरू आहे. भूमाफियांनी जमिनी बळकावण्याचा सपाटा सुरू केला आहे. 
टुली जागा, फ्लड झोन या जागाही शिल्लक ठेवल्या जात नाहीत. विना एनए/लेआऊट  प्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भविष्यात किचकट परिस्थितीचा सामना करावा लागून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार आहे. त्यामुळे अशा स्थितीत प्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे पडताळण्याची गरज आहे. 

पाच जणांना तहसीलदारांनी बजावली नोटीस
माजलगावमध्ये अवैधरीत्या प्लॉटिंग करणाऱ्या पाच जणांना तहसीलदार वैशाली पाटील यांनी नोटीस बजावली आहे. अकृषक परवाना नसताना अनधिकृतपणे त्याचा वापर होत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश आहेत. भागवत हजारे, झहीर खान, विक्रम गिरी, वामन मुंडे आणि सूर्यकांत दराडे या पाच जणांना नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

गावांसाठी ग्रामसेवकात स्पर्धा
माजलगाव शहरालगत विना एनए, लेआऊट प्लाॅटिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असताना येथील महसूल प्रशासन मूग गिळून गप्प आहे. वास्तविक पाहता अनेक ग्रामपंचायतींअंतर्गत येत असलेल्या या प्लाॅटिंगसाठी अनेक सरपंच व ग्रामसेवकांना मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळू लागला आहे. ही आजूबाजूची गावे घेण्यासाठी ग्रामसेवकांत स्पर्धा सुरू झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Plating even in flood zones; Land mafia to the city of Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.