सुखद वार्ता; कोरोनाबाधितांसाठी आणखी ३२० खाटांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:29+5:302021-04-03T04:30:29+5:30

बीड : जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या खाटा पाहता आणखी ३२० खाटांचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. यात २५० ...

Pleasant conversation; Arrangement of another 320 beds for coronary patients | सुखद वार्ता; कोरोनाबाधितांसाठी आणखी ३२० खाटांची व्यवस्था

सुखद वार्ता; कोरोनाबाधितांसाठी आणखी ३२० खाटांची व्यवस्था

Next

बीड : जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या खाटा पाहता आणखी ३२० खाटांचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. यात २५० खाटांवर ऑक्सिजन पुरवठा कार्यान्वित केला जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी भेट देऊन सर्व इमारती आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

जिल्ह्यात दररोज ३०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत. जिल्हा रुग्णालयात तर बोटावर मोजण्याइतक्या खाटा रिकाम्या असून कोवीड केअर सेंटरही भरले आहेत. हाच धागा पकडून जिल्हा रुग्णालयाच्या बाजुला असणाऱ्या सर्वच इमारतीत खाटा वाढविल्या जात आहेत. नर्सिंग महाविद्यालय, मुलींचे वसतिगृह, जळीत कक्ष, डोळ्यांचा कक्ष आदी ठिकाणी जवळपास ३२० खाटा बसविण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी प्रत्येक इमारतीचा आढावा घेतला. तसेच ऑक्सिजन खाटा उपलब्ध करण्याचीही माहिती घेतली. इमारतींमधून शौचालये, स्वच्छता, पाणी, वीज आदींबाबत माहिती घेत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सचिन आंधळकर, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.औदुंबर नालपे, तांगडे, मुकादम प्रकाश गायकवाड, बिभीषन गव्हाणे, नवनाथ मामा, कॉलमन परवेज पठाण, नवले आदींची उपस्थिती होती.

लसीकरण केंद्राला भेट देत बैठक

इमारती व खाटा उपलब्धतेचा आढावा घेतल्यानंर कुंभार यांनी लसीकरण केंद्राला भेट दिली. गर्दी, नियोजन, लसीची उपलब्धता आदींची माहिती घेतली. शहरातील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु नसल्याने सर्व भार जिल्हा रुग्णालयावर येत असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले. यावर या नागरी केंद्रातही लसीकरण सुरु करण्याच्या सुचना कुंभार यांनी केल्या.

ऑक्सिजन प्लांटची माहिती

धुलिंवदनाच्या दिवशी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले होते. यातील ऑक्सिजन निर्मीती, उपलब्धता, पुरवठा आदींचा आढावा कुंभार यांनी घेतला.

----

खाटांसंदर्भात शुक्रवारपर्यंतची स्थिती

एकूण आरोग्य संस्था ३६

खाटांची क्षमता ३७२१

मंजूर खाटा २७२१

रिकाम्या खाटा ९१६

होम आयसोलेशन रुग्ण ११४४

---

भविष्यातील खाटांचे नियोजन ३२०

ऑक्सिजन खाटा २५०

===Photopath===

020421\022_bed_9_02042021_14.jpeg

===Caption===

जिल्हा रूग्णालयातील खाटा उपलब्धतेसंदर्भात आढावा घेताना मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार. सोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सचिन आंधळकर, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.नालपे, तांगडे, परवेज पठाण, प्रकाश गायकवाड, नवले आदी.

Web Title: Pleasant conversation; Arrangement of another 320 beds for coronary patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.