चकलांबा गावात जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा; रस्ता दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:09+5:302021-07-16T04:24:09+5:30

तालुक्यातील सर्कलचे मुख्य गाव असलेल्या चकलांबा गावाची लोकसंख्या सुमारे १० ते १५ हजार असून या गावची बाजारपेठ मोठी असल्याने ...

The plight of the road leading to Chaklamba village; Demand for road repairs | चकलांबा गावात जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा; रस्ता दुरुस्तीची मागणी

चकलांबा गावात जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा; रस्ता दुरुस्तीची मागणी

googlenewsNext

तालुक्यातील सर्कलचे मुख्य गाव असलेल्या चकलांबा गावाची लोकसंख्या सुमारे १० ते १५ हजार असून या गावची बाजारपेठ मोठी असल्याने चकलांबा येथे खरेदीसाठी आजूबाजूचे शेकटा, पौळाचीवाडी, म्हाडुळासह पंधरा ते वीस गावांतील नागरिक दररोज चकलांबा येथे खरेदीसाठी येतात. मात्र गावात येणारा मुख्य रस्ता असलेला संत सावता माळी चौक ते बसस्थानक हा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाला आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर नुसता चिखलच चिखल, तर खड्डे पडल्याने खड्ड्यात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे नागरिकांना येताना व जाताना चिखल तुडवत व त्रास सहन करून जावे लागते. तसेच रस्त्यावर चिखल झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करून चांगला करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अशोक गुंजाळ यांनी केली आहे.

150721\sakharam shinde_img-20210715-wa0030_14.jpg~150721\sakharam shinde_img-20210715-wa0026_14.jpg

Web Title: The plight of the road leading to Chaklamba village; Demand for road repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.