ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:35 AM2021-05-27T04:35:09+5:302021-05-27T04:35:09+5:30
कमकुवत तारा, खांबामुळे धोका अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युतखांब व विद्युततारा जीर्ण झालेल्या ...
कमकुवत तारा, खांबामुळे धोका
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युतखांब व विद्युततारा जीर्ण झालेल्या आहेत. तर, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवण्यात आलेले पोल वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युत खांबांमधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकळत आहेत. अशा ठिकाणी नवीन विद्युतखांब लावण्यात यावेत व शहरातील जीर्ण झालेल्या तारा व पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद तांपडे यांनी केली आहे.
महामार्गालगतचा रस्ता खड्डेमय
अंबाजोगाई : शहरातून गेलेल्या लातूरकडील महामार्गावरील सेवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर हा सर्व्हिस रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. मुख्य रस्त्यापासून सर्व्हिस रस्त्याची उंची कमी झाली आहे. तसेच त्या बाजूने उतार झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना मोठे अडथळे येत आहेत. दुचाकी चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. खराब झालेला हा सर्व्हिस रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी रिपाइंचे सनी वाघमारे यांनी केली आहे.