दागिने, रोकड घेऊन पोलीस पत्नीचा पोबारा; अधिकारी म्हणतात बेपत्ताची नोंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:38 AM2021-09-23T04:38:30+5:302021-09-23T04:38:30+5:30

शहरातील अंकुशनगरात किरायाने राहणारा ३६ वर्षीय पोलीस अंमलदार गेवराई ठाण्यात कार्यरत आहेत. शिवाजीनगर ठाण्यात २१ सप्टेंबरला त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ...

Pobara of police wife carrying jewelery, cash; Officials say record the disappearance | दागिने, रोकड घेऊन पोलीस पत्नीचा पोबारा; अधिकारी म्हणतात बेपत्ताची नोंद करा

दागिने, रोकड घेऊन पोलीस पत्नीचा पोबारा; अधिकारी म्हणतात बेपत्ताची नोंद करा

Next

शहरातील अंकुशनगरात किरायाने राहणारा ३६ वर्षीय पोलीस अंमलदार गेवराई ठाण्यात कार्यरत आहेत. शिवाजीनगर ठाण्यात २१ सप्टेंबरला त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते २० रोजी गेवराई ठाण्यात कर्तव्यावर होते. घरी पत्नी होती. चुलतबंधू, तसेच सासू-सासरे यांच्याशी संगनमत करून पत्नीने रोख १ लाख ६० हजार रुपये व एक लाख रुपये किमतीची चांदी व दोन प्लॉटची कागदपत्रे घेऊन पळ काढला. चोरीचा गुन्हा नोंदवावा, यासाठी अंमलदार दोन दिवसांपासून ठाण्यात चकरा मारत आहे. दरम्यान, पत्नीला फोनवरून विचारणा केली असता नातेवाइकांनी फोन हिसकावून घेत जिवे मारण्याची धमकी दिली व पत्नीने हिंगोली येथे फोनवरून शिवीगाळ करून धमकाविल्याचा आरोप करीत अदखलपात्र गुन्हा नोंदविला. इकडे ठाण्यात तक्रार घेत नसल्याने या अंमलदाराने उपअधीक्षक संतोष वाळके यांच्याकडे कैफियत मांडली.

....

हे प्रकरण कौटुंबिक आहे. पत्नी बेपत्ताची तक्रार नोंदवून घेण्यास तयारी दर्शविली; मात्र संबंधित अंमलदार चोरीच्या तक्रारीवरच अडून बसला.

- साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर ठाणे

....

Web Title: Pobara of police wife carrying jewelery, cash; Officials say record the disappearance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.