बिंदुसरेची स्वच्छता महत्त्वाचीच; बीडमध्ये ३१ मे रोजी महास्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:21 AM2018-05-30T00:21:53+5:302018-05-30T00:21:53+5:30

Point-to-point cleanliness is important; In the Beed, on May 31, the Great Prevention Campaign | बिंदुसरेची स्वच्छता महत्त्वाचीच; बीडमध्ये ३१ मे रोजी महास्वच्छता अभियान

बिंदुसरेची स्वच्छता महत्त्वाचीच; बीडमध्ये ३१ मे रोजी महास्वच्छता अभियान

Next

बीड : प्रत्येकालाच आपले घरदार, आपला भाग स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. तर मग बिंंदुसरा नदी सुध्दा स्वच्छ व सुंदर असावी असे का वाटत नाही? महाराष्ट्रात  अनेक सामाजिक संस्था, जलसंधारण व स्वच्छतेसाठी श्रमदान व आर्थिक योगदान देत भाग घेतात. मग आपण आपल्या शहरासाठी श्रमदान का करू नय ? वर्षातील ३६५ दिवसांपैकी एक दिवस आपल्या बीड शहरासाठी म्हणजे आपल्यासाठी दया. सामाजिक कार्यात बीडकर कोठेही कमी नाही, हे दाखवून देण्याची संधी ३१ मे रोजी बिंंदुसरा नदी स्वच्छ अभियानातून मिळत आहे. या महाअभियानात प्रत्येक बीडकर सहभागी झाला पाहिजे, अशी अपेक्षा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केली.

मागील काही दिवसांमध्ये देश व राज्य पातळीवर स्वच्छ महानगर व स्वच्छ शहर म्हणून देश आणि राज्यातील काही शहरांचा उत्कृष्ट शहर म्हणून गौरव करण्यात आला. या उत्कृष्ट व स्वच्छ शहरांच्या यादीत बीड शहराचा नंबर का येऊ शकत नाही, असा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो. या दृष्टीने आपण स्वत:पासून सुरुवात करायला हवी. मागील वर्षी ३० जून रोजी बीड शहर स्वच्छ करण्याचा केलेला संकल्प शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्णत्वास नेला. बीड शहराला दोन भागात विभागणारी बिंंदुसरा नदी हे आपल्या बीडकरांचे भूषण आहे. शहरातून जाणाऱ्या या नदीचा परिसर शहरासाठी सुंदर असावा, या हेतूने महास्वच्छता अभियान हाती घेतले आहे.

बिंंदुसरा नदीच्या पात्रामध्ये कोणीही कोणतीही घाण, कचरा, टाकाऊ वस्तू टाकून देतात. प्लास्टिक पासून ते अनेक छोट्या मोठ्या वस्तू फेकल्या जातात. झाडे, झुडपे, घाण मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. घाणीचे साम्राज्य नदी परिसरात पहावयास मिळते. ही नदी विद्रूप झालेली दिसते. महापुराच्या संकटालाही सामोरे जावे लागले. पशुधनाची हानी, अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. या बाबी लक्षात घेतल्यास नदी स्वच्छता करणे हाच एकमेव पर्याय आहे.

सकारात्मक राजकारण करावे
एकमेकांवर काहीच न करता आरोप प्रत्यारोप करणे, गलिच्छ राजकारण करणे, चांगल्या कामात अडथळे आणणे, एखाद्याची निंंदा नालस्ती करणे यापेक्षा सकारात्मक राजकारण करावे आणि काम करत राहावे हाच आपला विचार राहिलेला आहे. त्यामुळे आपल्या बीडसाठी सर्वांनी एक दिवस देवून स्वच्छता अभियानात सहभागी होण्याीच गरज आहे. ३१ मे रोजी सकाळी ७ वाजता बिंंदुसरा नदीपात्रात जमा व्हावे तसेच महास्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही आ. मेटे यांनी केले.

Web Title: Point-to-point cleanliness is important; In the Beed, on May 31, the Great Prevention Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.