उपवासाच्या फराळातून विषबाधा; 60-70 जणांची दवाखान्यात धाव, गावात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 05:48 PM2022-07-10T17:48:25+5:302022-07-10T17:53:53+5:30

वडवणी(जि. बीड ) : तालुक्यातील मौजे कवडगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त जवळपास सर्वच घरात उपवास केला जातो. यासाठी भगर, शाबूदाण्याचा ...

Poisoning from fasting food; 60-70 people rushed to the hospital | उपवासाच्या फराळातून विषबाधा; 60-70 जणांची दवाखान्यात धाव, गावात खळबळ

उपवासाच्या फराळातून विषबाधा; 60-70 जणांची दवाखान्यात धाव, गावात खळबळ

Next

वडवणी(जि.बीड) : तालुक्यातील मौजे कवडगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त जवळपास सर्वच घरात उपवास केला जातो. यासाठी भगर, शाबूदाण्याचा वापर होत असतो. मात्र भगरीमुळे अनेकदा विषबाधेचे प्रकार घडले आहेत. कवडगाव येथे रविवारी 50 ते 60 जणांना उलटी, जुलाबाचा संडास त्रास सुरू झाला.

दुपारी 4 च्या सुमारास वडवणी शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. कवडगाव येथील नागरिकांना उपवासाचा फराळ केल्यानंतर उलटी, मळमळ होऊ लागल्याने नागरिकानी तातडीने उपचारार्थ शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले.

याबाबत खाजगी डाॅ. शंकर वाघ म्हणाले की, कवडगाव येथील नागरिकांना एकाच वेळेस उपवासाच्या फराळातून विषबाधा झाल्याचे दिसत असून उपचार सुरू आहेत. सर्व रूग्ण हे स्थिर आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे यांनी माहिती मिळताच रूग्णालयात भेट देऊन रुग्णांवर तात्काळ उपचारासाठी प्रयत्न केले, खाजगी रूग्णालयातही भेट देऊन उपचारासाठी सुचना दिल्या

Web Title: Poisoning from fasting food; 60-70 people rushed to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.