परळीत रस्त्यावर गर्दी होताच पोलिसांची ॲक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:34 AM2021-05-18T04:34:42+5:302021-05-18T04:34:42+5:30
परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशानुसार कडक निर्बंध लावलेले असतानाही शहरात सोमवारी सकाळी अरुणोदय मार्केट ...
परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशानुसार कडक निर्बंध लावलेले असतानाही शहरात सोमवारी सकाळी अरुणोदय मार्केट परिसर, हैदराबाद बँक ,मोंढा मार्केट या परिसरात लोकांचा विनाकारण वावर होत होता. तसेच फळविक्रेते गाडी लावून गर्दी जमवत होते. हे पोलिसांच्या निदर्शनाला येताच त्यांनी तेथील गर्दी हटवली.
लॉकडाऊनमुळे परळी शहरचे प्रभारी पोलीस निरीक्षक जी. बी. पालवे यांनी रस्त्यावरून विनाकारण येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध घातला. तसेच राणी लक्ष्मी टॉवर येथेही कडक नाकाबंदी करण्यात आली. येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरु होती. दरम्यान, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांनी मार्केट व राणी लक्ष्मी टॉवर येथे येऊन पाहणी केली व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे, राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बाजार समितीचे सचिव, पोलीस अधिकारी, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांची बैठक घेतली. या बैठकीत पेरणीचे दिवस असल्याने कृषी व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून दुकाने उघडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
===Photopath===
170521\img-20210517-wa0240.jpg
===Caption===
परळी शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात सोमवारी सकाळी गर्दी झाली होती पोलिसांनी लागलीच हटविली