राष्ट्रसंत भगवानबाबा मूर्ती विटंबना प्रकरणी आरोपीला अटक, प्रशासनाकडून शांततेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:19 PM2019-01-14T22:19:03+5:302019-01-14T22:20:45+5:30

याप्रकरणी गैरकृत्य केलेला आरोपीस पोलिसांनी अटक केली

Police arrested the accused in connection with insult of Rashtrasant Bhagwanbaba, appealed for peace by the administration | राष्ट्रसंत भगवानबाबा मूर्ती विटंबना प्रकरणी आरोपीला अटक, प्रशासनाकडून शांततेचे आवाहन

राष्ट्रसंत भगवानबाबा मूर्ती विटंबना प्रकरणी आरोपीला अटक, प्रशासनाकडून शांततेचे आवाहन

Next

बीड : राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीसाठी काही भाग बनविले होते. या भागाची विटंबना केल्याप्रकरणी मूर्तीकार प्रमोद कांबळे यांनी नगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचे पडसाद बीड जिल्ह्यात देखील उमटले आहेत. याप्रकरणी गैरकृत्य केलेला आरोपी स्वप्नील शिंदे याला पोलिसांनीअटक केली असून, जिल्ह्यात सर्वांनी शांतता राखावी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करु नये, असे आवाहन प्रशासन व विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात विविध ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला. 

जिल्हा कचेरीसमोर निदर्शने 
जिल्हा कचेरीसमोर ‘जय भगवान टायगर ग्रुपच्या वतीने’ आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित आरोपीवर कडक कारवाई करण्याची मगाणी केली. यावेळी शिवसेनेचे प्रा. शिवराज बांगर, जय भगवान टायगर गृपचे दिपक हंगे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थिती होती.

पाटोदा शहर बंद 
पाटोदा येथे या घटनेचा निषेध करण्यात आला. छत्रपती  शिवाजी महाराज चौकातून मूक मोर्चा निघाला, पोलीस ठाण्यात व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

परळीत रास्ता रोको 
घडलेल्या घटनाचा निषेद परळी येथे देखील करण्यात आला तसेच अटक केलेल्या आरोपीवर प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच तालुक्यातील पांगरी व संभाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी  फुलचंद कराड यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

Web Title: Police arrested the accused in connection with insult of Rashtrasant Bhagwanbaba, appealed for peace by the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.