बीडमध्ये पोलिसांकडून कॉफी शॉपच्या झडत्या सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 05:34 PM2019-05-12T17:34:59+5:302019-05-12T17:41:30+5:30

पोलिसांच्या कारवाईवर पालकांमधून समाधान व्यक्त

police continue their search in coffee shops in beed | बीडमध्ये पोलिसांकडून कॉफी शॉपच्या झडत्या सुरूच

बीडमध्ये पोलिसांकडून कॉफी शॉपच्या झडत्या सुरूच

googlenewsNext

बीड : शहरातील कॉफी शॉपमध्ये काही तरूण जोडपी अश्लिल चाळे करताना आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्वच हॉटेल आणि कॉफीशॉपवर नजर ठेवली होती. आजही त्यांच्या झडत्या सुरूच असून गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेल्या पावलाबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

बीड शहरातील कॉफी शॉपमध्ये बसून काही जोडपी कॉफी पिण्याच्या नावाखाली अश्लिल चाळे करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी स्वत: पेट्रोलिंग दरम्यान कॉफी शॉपची तपासणी केली होती. यावेळी शाहूनगर भागातील एका शॉपमध्ये त्यांना पडद्याआड अंधाऱ्या कॅबीनमध्ये एक युगूल अर्धनग्न अवस्थेत आढळले होते. त्यांनी या जोडप्याला समज देऊन सोडले होते. तर दुकान मालकावरही कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांनी सर्वच ठाणे प्रमुखांना शॉप, हॉटेलची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

दामिनी पथकाला दिल्या सूचना
छेडछाड, गैरप्रकाराची माहिती मिळताच अथवा तक्रार येताच तात्काळ कारवाई करण्याचे आदेश कबाडे यांनी दामिनी पथकाला दिले आहेत. कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. खोटी कारवाई झाल्यास पथकावरही कारवाई करण्याचा इशारा कबाडे यांनी दिला आहे.

कॉफीशॉपमध्ये गैरप्रकार घडत असतील तर आम्ही शांत बसणार नाहीत. प्रायव्हसी व इतर मुद्याला धरून पोलिसांवर आरोप होत असले, तरी आम्ही आमच्या कारवाया सुरूच ठेवणार. पालकांच्या तक्रारी आल्यावर थेट कारवाई केली जाईल. पालकांनीही आपल्या पाल्यांकडे थोडे लक्ष द्यावे. 
विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, बीड
 

Web Title: police continue their search in coffee shops in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.