पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या वाळूतस्करावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:47 AM2018-10-11T00:47:24+5:302018-10-11T00:48:44+5:30

विनापरवाना वाळूवाहतूक करणाºया ट्रकचालकाला पकडल्यानंतर शिरूर पोलिसांच्या ताब्यातून चालकाला पळवून नेण्याचा प्रकार घडला. यावेळी एका कर्मचाºयाला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून इतर दोघे फरार झाले.

The police filed a complaint against the wreaking havoc with the police | पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या वाळूतस्करावर गुन्हा दाखल

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या वाळूतस्करावर गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : विनापरवाना वाळूवाहतूक करणाºया ट्रकचालकाला पकडल्यानंतर शिरूर पोलिसांच्या ताब्यातून चालकाला पळवून नेण्याचा प्रकार घडला. यावेळी एका कर्मचाºयाला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून इतर दोघे फरार झाले.
तालुक्यातील जाटवड शिवारात विनापरवाना बेकायदेशीर रित्या ४ ब्रास वाळूची वाहतूक ट्रकचालक बाळू वाल्हेकर करत होता. यावेळी पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, परंतु चालकाने ट्रक न थांबविता वेगात पळविला. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रक रस्त्यावर सोडून पळ काढला. काही वेळेतच दुचाकी तसेच कारमधून आलेल्या काही जणांनी पोलिस अधिकारी व कर्मचाºयांसोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यातून सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापटीदरम्यान तुम्ही वाळूची ट्रक कशी घेवून जाता तेच बघतो अशी धमकी देत शिपाई गुजर यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी आरोपी बाळू वाल्हेकर, गणेश तावरे, संतोष शिंदे, कुंदन वाल्हेकरविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सहाय्यक पो. नि. महेश टाक हे करत आहेत.

Web Title: The police filed a complaint against the wreaking havoc with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.