घळाटवाडी फाट्यावर पोलिसांची तपासणी की वसुली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:14+5:302021-04-09T04:35:14+5:30
माजलगाव : तालुक्यातील घळाटवाडी फाट्यावर ग्रामीण पोलिसांकडून गुरुवारी सकाळपासून ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत ...
माजलगाव
: तालुक्यातील घळाटवाडी फाट्यावर ग्रामीण पोलिसांकडून गुरुवारी सकाळपासून ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. विनामास्क व कागदपत्रे नसलेल्यांना नियमाने पावती देण्याऐवजी विनापावतीची वसुली करण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
माजलगाव-पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर परभणी फाट्यापासून दीड कि.मी. अंतरावर घळाटवाडी फाट्यावर सकाळपासून ग्रामीण पोलीस ठाण्यामार्फत विनामास्क येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी काही पोलीस व होमगार्ड दिसून येत होते. या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी विनामास्क असणाऱ्यांवर कारवाई म्हणून दंडाची पावती देणे आवश्यक होते. पोलीस मात्र तसे करताना दिसून येत नव्हते. ज्यांच्या तोंडाला मास्क दिसत होते त्यांना हे पोलीस गाडीची कागदपत्रे मागत होते, नसता दंड भरावा लागेल, असे बजावत होते. दंडाची पावती न देताच वरचेवर वसुली करत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. यामुळे ग्रामीण भागात जाणारे व येणारे दुचाकीस्वार अर्ध्या कि.मी. अंतरावर थांबलेले दिसून येत होते. यामुळे घळाटवाडी फाट्याच्या दोन्ही बाजूला दुचाकीस्वारांची मोठी गर्दी पहावयास मिळत होती. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांत पोलिसांविरोधात रोष पहावयास मिळत होता.
कोरोनामुळे शासन व नागरिक हैराण असताना काही लोकांची मात्र कोरोनामुळे चांदी होताना दिसत आहे.
चाैकशी करणार
घळाटवाडी फाट्यावर वाहनांवर कारवाई करण्यासाठी जे कर्मचारी नियुक्त होते त्यांना बोलावून याबाबत विचारणा करण्यात येईल.
- सुरेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव.
===Photopath===
080421\purusttam karva_img-20210408-wa0038_14.jpg