धारूरमध्ये पोलीस, नगरपरिषदेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:53+5:302021-05-17T04:32:53+5:30
धारूर : शहरात दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पोलीस व नगर परिषदेने संयुक्त कारवाई करत ७ हजार ५०० ...
धारूर : शहरात दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पोलीस व नगर परिषदेने संयुक्त कारवाई करत ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला, तर नियमबाह्यपणे दुकाने उघडी ठेवलेल्या दोन व्यावसायिकांवरील कारवाई तहसीलदारांकडे प्रस्तावित करण्यात आली. पोलीस व नगरपरिषद कर्मचाऱ्यांची दोन स्वतंत्र पथके नियुक्त केली होती. शिवाजी चौकात पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न वापरल्याबाबत कारवाई करून ४ हजार ८०० रुपये दंड वसूल केला, तर धारूर केज रस्त्यावर टोल नाका भागात सहायक पोलीस निरीक्षक कानीफनाथ पालवे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २,७०० रुपये दंड वसूल केला. या कारवाईमुळे नियम मोडू पाहणाऱ्यांनी धसका घेतला आहे.
===Photopath===
160521\img-20210516-wa0134_14.jpg