महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी ‘तो’ पोलीस नाईक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:35 AM2019-05-28T00:35:11+5:302019-05-28T00:35:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ड्यूटीवरून घरी परतणा-या महिला पोलीस कर्मचाºयाचा रस्त्यात अडवून विनयभंग करणा-या पोलीस नाईकला निलंबीत करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ड्यूटीवरून घरी परतणा-या महिला पोलीस कर्मचाºयाचा रस्त्यात अडवून विनयभंग करणा-या पोलीस नाईकला निलंबीत करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी सोमवारी हे आदेश काढले. दरम्यान, हा पोलीस नाईक अद्यापही फरारच आहे.
पूर्वी शहरातील एका ठाण्यात कार्यरत असलेला व सध्या आष्टी ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असलेला शेख शौकत या पोलीस कर्मचा-याने शहरातील एका ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी ड्यूटी संपवून घरी परतत असताना रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला होता. यापूवीर्ही त्याने असा प्रकार केल्यानेच त्याची आष्टीत बदली केली गेली होती.
दरम्यान, या प्रकरणी शनिवारी रात्री शहर पोलिसांत त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकाराची अपर अधीक्षक विजय कबाडे यांनी गंभीर दखल घेतली. सोमवारी शौकत शेखच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
दरम्यान, शौकत शेख याच्या खात्यांतर्गत चौकशीचेही आदेश देण्यात येणार असून प्राथमिक चौकशी व विभागीय चौकशी होणार असल्याचे अपर अधीक्षक विजय कबाडे यांनी सांगितले.