लग्न सोहळ्यात पोलिसांची धाड, चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:00+5:302021-02-23T04:51:00+5:30
अंबेजोगाई : येथील एका हाॅटेलमध्ये धूमधडाक्यात लग्नसोहळा सुरू असताना, पोलिसांनी धाड टाकून हॉटेल मालक, ज्यांच्या घरी लग्न होते ती ...
अंबेजोगाई : येथील एका हाॅटेलमध्ये धूमधडाक्यात लग्नसोहळा सुरू असताना, पोलिसांनी धाड टाकून हॉटेल मालक, ज्यांच्या घरी लग्न होते ती यजमान मंडळी आणि डॉल्बी मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच कोरोनासंदर्भात दिलेल्या आदेशाला नगरसेवकांकडूनच केराची टोपली दाखविल्याने लोकप्रतिनिधीच लोकांच्या जीविताशी खेळ खेळत असल्याचे दिसून आले.
बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने वेळीच खबरदारी न घेतल्यामुळे लग्न समारंभ, उद्घाटन सोहळे मोठ्या प्रमाणावर रंगू लागल्याने, कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी चिंता व्यक्त केली होती. सार्वजनिक समारंभ, लग्नसोहळे, शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालय, खासगी क्लासेस यांच्यावर पुन्हा निर्बंध आणत, कार्यवाहीच्या सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या होत्या. असे असताना २० फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अंबेजोगाई येथील तथागत चौकात असलेल्या हाॅटेल प्रवीणच्या बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात धूमधडाक्यात लग्नसोहळा सुरू असताना, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकून हॉटेल मालक कोपले व ज्यांच्या घरचे लग्न होते, ते अशोक श्यामलाल मोदी (माजी नगरसेवक तथा नगरसेविका पती), प्रदीप शामलाल मोदी, डॉल्बी मालक ऋषिकेश चापेकानडे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशानुसार कोविड रोगाबाबत निष्काळजीपणा केल्याच्या कारणावरून शहर पोलीस ठाण्यात साथरोग प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा व अन्य कलमांनुसार गुन्हा नोंद झाला आहे.
फोटो : अंबेजोगाई येथे कोरोनाबाबत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी लग्नसोहळ्यात धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली.
===Photopath===
210221\avinash mudegaonkar_img-20210221-wa0076_14.jpg