महसूलच्या ताब्यातून पळविलेला वाळूचा ट्रक पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:37+5:302021-05-05T04:55:37+5:30

गेवराई : महसूल पथकाने पकडलेला वाळूचा ट्रक माफियांनी दफेदार व तहसीलदारांच्या वाहनचालकास धक्काबुक्की व मारहाण करून तहसील कार्यालयाच्या आवारातून ...

Police seized a truckload of sand stolen from the possession of the revenue | महसूलच्या ताब्यातून पळविलेला वाळूचा ट्रक पोलिसांनी पकडला

महसूलच्या ताब्यातून पळविलेला वाळूचा ट्रक पोलिसांनी पकडला

Next

गेवराई : महसूल पथकाने पकडलेला वाळूचा ट्रक माफियांनी दफेदार व तहसीलदारांच्या वाहनचालकास धक्काबुक्की व मारहाण करून तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेदरम्यान घडल्यानंतर तक्रार येताच, पोलिसांनी तत्परतेने शोध घेत मांजरसुंबा घाटात ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले. हा ट्रक येथील पोलीस ठाण्यात लावला.

तीन दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा एल.पी. ट्रक (एमएच. ११ ए. सी. ५५९३) पकडला होता. चालकाला पावतीची विचारणा केली असता, रॉयल्टीची पावती नसल्याने महसूल पथकाने हा ट्रक तहसील कार्यालयात आणून लावला होता. या ट्रक मालकाला तहसीलदारांनी १ लाख ८६ हजार ५२८ रुपये दंडाची नोटीस बजावली होती, परंतु मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक इसम मद्यपान करून तहसील कार्यलयात आला. दफेदार आर.बी आम्लेकर व तहसीलदारांचे वाहनचालक शेख सत्तार या दोन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण करून चावी हिसकावून वाळूचा ट्रक पळवून नेला. हा सगळा प्रकार तहसील कार्यालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेची माहिती मिळताच, गेवराई पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांनी ट्रक कोणत्या दिशेने गेला, याची माहिती मिळविली. त्यानंतर, ते स्वत: आणि पोलीस कर्मचारी शरद बहिरवाळ हे मांजरसुंबाच्या दिशेने गेले. शोध घेत अवघ्या दोन तासांत हा ट्रक मांजरसुंबा घाटात पकडला, तसेच दोघांना ताब्यात घेतले. हा ट्रक येथील पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून, या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, महसूलच्या ताब्यातील पळवून नेलेला वाळूचा ट्रक पोलिसांनी पकडून आणला.

Web Title: Police seized a truckload of sand stolen from the possession of the revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.