पोलीस बंदोबस्तात बार्शी रोडवरील अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:12 AM2020-02-16T00:12:37+5:302020-02-16T00:13:18+5:30

बीड नगर परिषदेने आता अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी सकाळ पासूनच बार्शी रोड व जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यास सुरूवात झाली.

Police settle a hammer on encroachment on Barshi Road | पोलीस बंदोबस्तात बार्शी रोडवरील अतिक्रमणांवर हातोडा

पोलीस बंदोबस्तात बार्शी रोडवरील अतिक्रमणांवर हातोडा

Next
ठळक मुद्दे५० अतिक्रमणे हटविले। बीड न.प.च्या स्वच्छता विभागाची कारवाई

बीड : बीड नगर परिषदेने आता अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी सकाळ पासूनच बार्शी रोड व जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यास सुरूवात झाली. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त होता. दिवसभरात ५० अतिक्रमणे हटवली.
‘बीड शहरात अतिक्रमणांचा पुन्हा विळखा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पालिका खडबडून जागी झाली. पोलिसांकडून बंदोबस्त मिळताच संपूर्ण यंत्रणा अतिक्रमणे हटविण्यासाठी रस्त्यावर उतरली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनपर्यंतची जवळपास ५० अतिक्रमणांवर हातोडा फिरविण्यात आला. यामध्ये दोन टपऱ्याही जप्त करण्यात आल्या. काही लोकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. या मोहिमेत मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, आर.एस.जोगदंड, भारत चांदणे, प्रशांत ओव्हाळ, राजु वंजारे, महादेव गायकवाड, मुन्ना गायकवाड यांच्यासह १०० कर्मचारी, ८ ट्रॅक्टर, १ जेसीबी असा फौजफाटा होता. बंदोबस्त असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.

Web Title: Police settle a hammer on encroachment on Barshi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.