सर्वसामान्य जनतेला वेठीस धरल्यास पोलिसांवर कारवाई करणार - पोद्दार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:30 IST2019-12-10T00:29:57+5:302019-12-10T00:30:22+5:30
सध्या बीड जिल्ह्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी येतात. पण ठोस पुरावे नसल्याने कारवाई करता येत नाही. तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा. तडजोड करत असतील तर शूटिंग करा अशा अधिकारी, कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला.

सर्वसामान्य जनतेला वेठीस धरल्यास पोलिसांवर कारवाई करणार - पोद्दार
कडा : सध्या बीड जिल्ह्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी येतात. पण ठोस पुरावे नसल्याने कारवाई करता येत नाही. तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा. तडजोड करत असतील तर शूटिंग करा अशा अधिकारी, कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला.
आष्टी पोलीस ठाण्यात सोमवारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे वार्षिक तपासणीसाठी आले असता आयोजित जनता दरबारात जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. तालुक्यात जर कोणी अधिकारी, कर्मचारी जर तडजोड आणि आर्थिक मनस्ताप देऊन अडवणूक करत असतील तर तक्रार देऊ नका; फक्त शूटिंग किंवा रेकॉर्डिंग करा मी लगेच कारवाई करेल असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. साहेबराव दरेकर, किशोर हंबर्डॅ, माजी जि.प. अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, नगरसेवक दीपक निकाळजे, अरुण निकाळजे, नामदेव राऊत, आण्णासाहेब चौधरी, राम खाडे, सुरेखा केरूळकर, सरपंच अनिल ढोबळे, सादिक कुरेशी, काकासाहेब शिंदे, अनंत जोशी, डॉ. शैलजा गर्जे, उपअधीक्षक विजय लगारे, पो.नि. माधव सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, होमगार्ड, पोलीस मित्र, नागरिक उपस्थित होते.
महिला मुलीची छेडछाड, रहदारीचा अडथळा
४तालुक्यात सर्वाधिक शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, असल्याने मोठ्या प्रमाणावर महिला व मुलीची संख्या असल्याने छेडछाड रोखावी. कडा , आष्टी येथील रहदारीला अडथळा निर्माण होत आहे तो मार्गी लावावा, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबद्दल जनतेने यावेळी त्यांच्याकडे तक्रारी केल्या.