बीडमध्ये आज मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:09 AM2019-04-18T00:09:25+5:302019-04-18T00:12:10+5:30

बीड लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून, कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना देखील झाले आहेत.

Polling in Beed today; The administration is ready to complete | बीडमध्ये आज मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

बीडमध्ये आज मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

Next

बीड : बीड लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून, कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना देखील झाले आहेत. मतदारांनीही शांततेत मतदान करुन प्रशासनास सहकार्य करावे. प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उप जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर हे उपस्थित होते.
यावेळी पाण्डेय म्हणाले की, निवडणूक रिंगणात ३४ उमेदवार पुरुष व दोन उमेदवार महिला आहेत. ९३०० अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांवर नियुक्त केले आहेत. ९५२ राखीव कर्मचारी आहेत. मतदारसंघात २३११ मूळ मतदान केंद्रे, तर १४ सहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत. शहरी भागात ७६१, तर ग्रामीणमध्ये १५६४ मतदान केंद्रे आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघात ३९६, माजलगाव ३७४, बीड ३७१, आष्टी ४३८, केज ४०७ आणि परळी विधानसभा मतदार संघात ३३९ मतदान केंद्रे आहेत. मतदारांची संख्या २० लाख ४१ हजार १८१ आहे.
११०९ मतदान केंद्रांमध्ये ४ हजार ३५७ अपंग मतदार आहेत. आष्टीमधील सिदेवाडी या मतदान केंद्रावर संपूर्ण कर्मचारी हे दिव्यांग आहेत. महिला कर्मचाऱ्यांद्वारे संपूर्ण महिला सखी मतदार केंद्र तयार केले आहे, तर दिव्यांगांसाठी स्वावलंबी मतदान केंद्र निर्माण केल्याची माहिती पाण्डेय यांनी यावेळी दिली.

Web Title: Polling in Beed today; The administration is ready to complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.