बीडमध्ये होतेय रुग्णालयांकडूनच प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:38 AM2018-05-23T00:38:50+5:302018-05-23T00:38:50+5:30

बीड शहरातील सम्राट चौकात एका दवाखान्यातील बायोमेडिकल वेस्टेज कचराकुंडीत टाकल्याप्रकरणी पाच हजार रुपये दंडाची कारवाई नगरपालिकेने गुरुवारी केली होती. हाच धागा पकडून जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासंदर्भात यंत्रणा कशी आहे याचा आढावा घेतला. यावेळी यंत्रणा तर अपुरी आहेच, शिवाय अनेक रुग्णालयातील कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावला जात नसल्याचे समोर आले आहे.

Pollution from hospitals is in Beed | बीडमध्ये होतेय रुग्णालयांकडूनच प्रदूषण

बीडमध्ये होतेय रुग्णालयांकडूनच प्रदूषण

Next
ठळक मुद्देबायोमेडिकल वेस्टेजची योग्य विल्हेवाट लागेना; कुणालाच गांभीर्य नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील सम्राट चौकात एका दवाखान्यातील बायोमेडिकल वेस्टेज कचराकुंडीत टाकल्याप्रकरणी पाच हजार रुपये दंडाची कारवाई नगरपालिकेने गुरुवारी केली होती. हाच धागा पकडून जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासंदर्भात यंत्रणा कशी आहे याचा आढावा घेतला. यावेळी यंत्रणा तर अपुरी आहेच, शिवाय अनेक रुग्णालयातील कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावला जात नसल्याचे समोर आले आहे. काही रुग्णालयांकडूनच प्रदूषण होत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जिल्ह्यातील हॉस्पिटल व क्लिनिकमधून निघणारा कचरा उचलण्याची जबाबदारी बीडमधील चंपावती वेस्टेज मॅनेजमेंट या संस्थेला दिली आहे. ही संस्था जिल्ह्यातील नोंदणीकृत ३७६ हॉस्पिटल व क्लिनिकमधील कचरा उचलते. प्रत्यक्षात मात्र हॉस्पिटल व क्लिनिकची संख्या ५०० च्यावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरुन बहुतांश लोकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानाच घेतला नसल्याचे स्पष्ट होते. असे असले तरी याची तपासणीची तसदी प्रदूषण मंडळ घेत नसल्याचे दिसून येते. कार्यालय व हॉस्पिटल यांच्या संगनमतानेच जिल्ह्यात परवाना न घेताच हॉस्पिटल, क्लिनिक सुरु असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे.

१५७ हॉस्पिटल : लक्ष देणे गरजेचे
बीड शहरात १५७ हॉस्पिटल व क्लिनिकची नोंदणी आहे. जवळपास २५० किलोग्रॅम (जाळण्यायोग्य) कचरा निघतो. इंजेक्शन, सलाईन असा जाळता न येणारा कचरा १५० किग्रॅच्या घरात आहे. जिल्ह्यात ५०० ते ६०० किलोग्रॅम कचरा निघत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. जाळण्यायोग्य कचऱ्याचे पाली येथील प्लॅन्टवर भस्मीकरण केले जाते. जो कचरा जाळता येत नाही त्यावर योग्य प्रक्रिया करुन सांगली येथे पाठविला जात असल्याचे संस्थेचे संचालक एस. बी. वाघमारे यांनी सांगितले.

अनेकांची नोंदणीच नाही
शहरासह जिल्ह्यात अनेक हॉस्पिटल व क्लिनिकने या संस्थेकडे नोंदणीच केलेली नाही.
नगरपालिकेच्या घंटागाडी, कुंडीतच बायोमेडिकल वेस्टेज टाकले जात असल्याचे समोर आले आहे.
असे कृत्य करणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

कचरा संकलनासाठी अपुरी वाहने
जिल्ह्यात नोंदणीकृत हॉस्पिटल व क्लिनिकची मोठी संख्या आहे. असे असतानाही संबंधित एजन्सीकडे बायोमेडिकल वेस्टेज संकलनासाठी केवळ चारच वाहने आहेत. याच वाहनांद्वारे दररोज जिल्ह्यातील कचरा संकलित केला जात असल्याचा दावा संस्थेने केला आहे. परंतु प्रत्यक्षात हा दावा फोल ठरु पाहत आहे. नियमित व वेळेवर वेस्टेज संकलन करुन होणारे प्रदूषण थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. नगर पालिकेच्या अधिकारी, कर्मचाºयांनीही कचºयाचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच रस्त्यावर कचरा टाकून शहर अस्वच्छ करणाºयांवर कारवाईसाठी योजना आखण्याची गरज आहे. सध्या बीड पालिकेचा स्वच्छता विभाग चांगली कामगिरी करीत आहे. यापूर्वीचे अनुभव पाहता त्यात सातत्य ठेवले जात नाही. आता यामध्ये किती सातत्य राहते? हे वेळच ठरवेल.

सहा वर्षांपूर्वी कारवाई
बीड शहरातील बसस्थानकासमोरील असलेल्या एका हॉस्पिटलमधील बायोमेडिकल वेस्टेज रस्त्यावर टाकल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काही दिवस त्यांच्यामध्ये भीती होती. मात्र, सध्या पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Pollution from hospitals is in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.