वाहनांतून प्रदूषण ; कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:34 AM2021-08-15T04:34:35+5:302021-08-15T04:34:35+5:30
खासगी वाहनाचे प्रवासी भाडे महागले अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात खासगी प्रवासी वाहनाचे भाडेही महागले असल्याने याचा फटका प्रवाशांना बसत ...
खासगी वाहनाचे प्रवासी भाडे महागले
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात खासगी प्रवासी वाहनाचे भाडेही महागले असल्याने याचा फटका प्रवाशांना बसत आहे. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी शासकीय परिवहन सेवा बंद आहे. यामुळे ग्रामस्थांना खासगी वाहनांशिवाय पर्याय उरला नाही. त्यात अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यात येत आहे.
वन्य प्राण्यांकडून पिकाचे नुकसान
अंबाजोगाई : यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी आंबा व इतर फळबाग लागवड केली आहे. वातावरणामुळे वाढते तापमान आणि वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे हे पीक संकटात सापडले होते. आता हे पीक बहरत असताना वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने हे पीक संकटात सापडल्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मुडेगावचे माजी सरपंच विलास जगताप यांनी केली आहे.
खेडेगावात अनियमित वीजपुरवठा
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहेत. यामुळे ऊस, भाजीपाला व विविध पिकांचे सिंचन खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप मुडेगावकर यांनी केली आहे.
कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
अंबाजोगाई : खरीप हंगामातील विविध पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. अंतर्गत शुक्रवारी या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कीड नियंत्रण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गेल्या आठवडाभरापासून कृषी विभागाने शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन सुरु केले आहे. या अंतर्गत खरीप पिकांची पाहणीही केली जात आहे.
बाजारपेठेतील व्यवसाय सुरळीत
अंबाजोगाई : कोरोनाचे संकट गेल्या काही दिवसांपासून बहुतांशी निवळलेले आहे. रुग्णसंख्येचा आलेख नीचांकावर असून नागरिकही आता बिनधास्तपणे घराबाहेर पडत आहेत. यामुळे बाजारपेठेतील सर्वच व्यवसाय सुरळीत झाल्याचे दिसत आहे.
अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीची मागणी
अंबाजोगाई : शहरातील जुन्या वसाहतीत जैन गल्ली,मंडई बाजार रोड या परिसरातील रस्ते व नाल्या खराब झाल्या आहेत. तसेच अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचत आहे. न. प. ने रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.