नांदूर ते केज रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:03+5:302021-01-03T04:34:03+5:30
वीज पुरवठा सुरळीत करा चौसाळा : रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना पाणी देण्याची गरज असून, मोटारीसाठी लागणारी ...
वीज पुरवठा सुरळीत करा
चौसाळा : रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना पाणी देण्याची गरज असून, मोटारीसाठी लागणारी वीज रात्री दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या थंडीमध्ये पाणी द्यावे लागत आहे. महावितरणने वीज पुरवठा दिवसादेखील द्यावा, अशी मागणी अमोल जगताप, काकासाहेब खंडागळे, समाधान जगताप यांनी केली आहे.
पोत्रा येथून वाळू उपसा
बीड : तालुक्यातील सात्रापोत्रा येथील नदीपात्रातून सर्रास ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा सुरू आहे. नांदूर परिसरातील ट्रॅक्टरचालक चोरट्या पद्धतीने वाळू उपसा करतात. भरधाव ट्रॅक्टरमुळे परिसरातील गावांमध्ये रस्तेदेखील खराब होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. पोलिसांनी हा अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी आहे.
हातपंप दुरुस्त करावेत
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे पाणी पुरवठा करण्यासाठी असलेले हातपंप अनेक वर्षांपासून बंद आहेत. वेळोवेळी मागणी करूनही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. दुरुस्तीची मागणी सरपंच विक्रम खंडागळे यांनी केली.
पदपथावर अतिक्रमण
अंबाजोगाई : शहरातील अनेक भागांत व मुख्य रस्त्याच्या बाजूला शिवाजी चौकात फुटपाथ बांधलेले आहेत. नागरिकांना फुटपाथवरून विनासंकोच चालता यावे यासाठी हे फुटपाथ असतात. मात्र, या फुटपाथवर अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.