नेकनूर ते नांदूर रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:02+5:302021-01-23T04:34:02+5:30
स्थानकात अस्वच्छता केज : येथे बसस्थानक मागील दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहे. तरीदेखील बसस्थानक परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न मात्र कायम ...
स्थानकात अस्वच्छता
केज : येथे बसस्थानक मागील दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहे. तरीदेखील बसस्थानक परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न मात्र कायम आहे. नागरिकांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहेत. मात्र, त्यामध्ये साफसफाई केली जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे
वृक्षतोड थांबवा
पाटोदा : तालुक्यातील अनेक भागामधून झाडांची कत्तल बेसुमार केली जात आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असून, सॉ-मिल चालक मात्र मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत. तहसीलदारांची परवानगी झाडे तोडण्यासाठी आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारे परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे.
ठिकठिकाणी होतेय अवैध दारू विक्री
गेवराई : तालुक्यातील गढी परिसरातील हॉटेल, ढाब्यांमधून गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलिसांच्या कारवाया थंडावल्याने राजरोस विक्री असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
बसथांब्याची मागणी
बीड : तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या खजाना विहिरीजवळ बसथांबा करावा, अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे. हे ठिकाण ऐतिहासिक असल्याने येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटकांची गर्दी होते. वाहनांअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी येथे बसथांबा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गुटखा विक्री तेजीत
पाटोदा : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील टपऱ्या, दुकानांवर सर्रासपणे गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने येथे कारवाई करणे गरजेचे आहे. मागील अनेक दिवसांपासून शहरासह तालुक्यात कारवाया झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.
मांजरसुंबा-केज महामार्गाचे काम अपूर्ण
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर मार्गे मांजरसुंबा ते केज या राज्य महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असून, अनेक वेळा महामार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.
बस प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना
अंबाजोगाई : लॉकडाऊननंतर थांबलेली एसटी बस आता पूर्ण प्रवासी क्षमतेने धावू लागली आहे; परंतु बसमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत नसल्याने कोरोनाच्या फैलावाची शक्यता नाकारता येत नाही.