निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:46 AM2021-01-08T05:46:38+5:302021-01-08T05:46:38+5:30
स्वेटर खरेदीला पसंती अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या आठवड्यापासून थंडी जाणवू लागली आहे. वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे थंडी-ताप, सर्दी, खोकल्याचे ...
स्वेटर खरेदीला पसंती
अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या आठवड्यापासून थंडी जाणवू लागली आहे. वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे थंडी-ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे, तर दुसरीकडे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी होऊ लागल्याचे चित्र अनेक कपड्यांच्या दुकानात दिसून येत आहे.
रानडुकरांची धास्ती
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रानडुकरांचा सुळसुळाट झाला आहे. शेतात रानडुकरे पिकांची नासाडी करीत आहेत. याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांवर रानडुकरांनी हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, लहान मुले, महिला रानडुकरांच्या भीतीमुळे शेतात जाण्यास धजावत नाहीत.
सामाजिक भान दिसेना
अंबाजोगाई : शहर व ग्रामीण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. अजूनही कोरोनासदृश स्थिती असतानाही नागरिक विनामास्क बिनधास्त फिरत आहेत. नागरिकांनी सक्तीने मास्कचा वापर करावा व दक्षता बाळगावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.