सौताडा-जामखेड रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:48+5:302021-09-25T04:36:48+5:30
दोन दिवसांपासून धानोरा परिसरात पाऊस धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र ...
दोन दिवसांपासून धानोरा परिसरात पाऊस
धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. धानोरा परिसराला वरदान ठरणारा कांबळी प्रकल्प सलग दुस-या वर्षीही भरला आहे. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बुधवारी रात्री सावरगाव, शेडाळा, वेलतुरी, सुलेमानदेवळा परिसरात पाऊस झाल्याने कांबळी नदीला पुन्हा पूर आला होता.
...
सततच्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान
धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे. या परिसरात शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची लागवड केली आहे. मोलामहागाचे बियाणे आणून लागवड केली आहे. काहींनी कांदापेरणी केली आहे. परंतु, सततच्या पावसाने शेतात पाणी साठून कांदारोपे पिवळी पडून सडली आहेत. यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे आहेत. तरी, या परिसरातील कांदा पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
...
अतिपावसाने कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव
धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात यंदा कपाशीची लागवड कमी झाली आहे. यंदा शेतक-यांनी कांदा, तूर पिकांवर भर दिला आहे. परंतु, कांदापीकही पिवळे पडले आहे. कपाशीही सततच्या पावसाने खराब झाली आहे. कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. पर्यायाने याचा फटका शेतक-यांंना बसणार आहे.
...
दादेगाव-भोजेेवाडी रस्त्यावर खड्डेच खड्डे
धानोरा : आष्टी तालुक्यातील दादेगाव-भोजेवाडी रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे गेल्या दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काम झाले होते. परंतु, यंदा झालेल्या जोरदार पावसाने या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना त्रास होत आहे. तरी, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा, आंदोलनाचा इशारा परिसरातील नागरिकांंनी दिला आहे.
...
कांबळी नदीला पूर, वागजाई वस्तीचा संपर्क तुटला
धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरात सावरगाव, गंगादेवी, भोजेवाडी, सुलेमानदेवळा, कारखेल परिसरात बुधवार, गुरुवारी झालेल्या पावसाने कांबळी नदीला पूर आला होता. या पावसाने भोजेवाडी येथील तलाव भरला असून हिवरा येथील चव्हाणवस्ती, वागजाईवस्तीचा गेल्या तीन, चार दिवसांपासून संपर्क तुटला आहे. तरी, हिवरा-दादेगाव रस्त्यावर कांबळी नदीवर पूल उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.