संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांची काळजी घ्यावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:26+5:302021-06-06T04:25:26+5:30

कोविड कक्षाच्या अधीक्षका अरुणा केंद्रे अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरण्याच्या मार्गावर आहे. मात्र तिसरी लाट ...

Possibly take care of the kids in the third wave? | संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांची काळजी घ्यावी?

संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांची काळजी घ्यावी?

Next

कोविड कक्षाच्या अधीक्षका अरुणा केंद्रे

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरण्याच्या मार्गावर आहे. मात्र तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पालकांनी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी मुलांना वेळेवर सकस आहार, वेळेवर उठणे, प्राणायाम करून घेणे तसेच पावसाळ्यात मुलांना डायरिया होऊ नये यासाठी शुद्ध पाणी द्यावे. यासह आरोग्य विभागाकडून लहान मुलांना दिल्या जाणारे लसीकरण करून घेतल्यास मुलांना आपण कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवू शकतो, असे मत लोखंडी येथील जम्बो कोविड कक्षाच्या अधीक्षका तथा स्त्री रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. अरुणा केंद्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत घशात दुखणे, सर्दी किंवा इतर लक्षणे आढळून येते होती. मात्र दुसऱ्या लाटेत लक्षणे वेगळी असल्याने अनेकांना कोरोना होऊन गेला तरी समजले नाही किंवा अनेकांना बाधित झाल्यावर उशिरा लक्षणे जाणवली. शक्यतो दुसऱ्या लाटेत अंगदुखी, पोटदुखणे, खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवणे, अशी लक्षणे रुग्णांमध्ये अधिक होती, असे त्या म्हणाल्या.

दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक बाधित ३० वर्षाच्या पुढील व्यक्ती अधिक होत्या. बहुसंख्य रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केल्यास निगेटिव्ह येत होती. मात्र एचआर सिटीस्कॅन केल्यानंतर स्कोअर १२ ते १४ येत होता. हे कळण्यास उशीर झाल्याने संसर्गाचे प्रमाण वाढल्याने रुग्ण अत्यवस्थ मोठ्या प्रमाणावर होते. आरोग्य विभागाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व ४५ वयाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यात ३० हजारांपेक्षा जास्तजणांचे लसीकरण झाले आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. लसीकरण झाल्याने अनेकांना जास्त त्रास जाणवला नाही, तर अनेकजण कोरोनापासून बचावले. परिणामी लसीकरण झालेल्या वृद्ध व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात जाणवला, असे त्यांनी सांगितले.

संभाव्य दुसरी लाट आता ओसरत आहे. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी पालकांनी बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हात, पाय धुतल्यानंतरच लहान मुलांना जवळ घ्यावे. मुलांना शक्य तो बाहेर जाऊ देऊ नये. सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर याचे मुलांना मार्गदर्शन व खबरदारीचे उपाय शिकविल्यास निश्चितच आपण कोरोनावर मात करू शकतो. ज्या मुलांना किडनी, हृदयविकार, मधुमेह, बालदमा यांचा त्रास आहे, तसेच ज्या मुलांच्या विविध आजारांमुळे शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, अशा मुलांना त्यांच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घ्यावीत. त्यांच्याच सल्ल्यानुसार औषधे द्यावीत. अशा मुलांची काळजी घेणे व त्यांना जपणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन प्रकल्पातून दिलासा

१६ ते २३ स्कोअर असलेल्या अनेक रुग्णांना जीवदान

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मिळाले आहे. लोखंडीच्या जंबो कोविड सेंटरमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार झाले. यात १६ ते २३ स्कोअर असलेले अनेक रुग्ण दाखल झाले. यशस्वी उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. लोखंडी येथे दोन युनिटच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. दोन्ही युनिटमध्ये ४०० पेक्षा जास्त ऑक्सिजन बेड आहेत. लिक्विड ऑक्सिजन युनिट कार्यान्वित झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.

===Photopath===

050621\05bed_3_05062021_14.jpg

===Caption===

 अरुणा केंद्रे 

Web Title: Possibly take care of the kids in the third wave?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.