जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत पोस्ट कोविड ओपीडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:03 AM2021-02-21T05:03:27+5:302021-02-21T05:03:27+5:30
आरोग्य विभागाने शनिवारी याबाबत माहिती दिली. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे, तर काही ...
आरोग्य विभागाने शनिवारी याबाबत माहिती दिली. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे, तर काही लोकांना कोरोनामुक्त झाल्यानंतरही थकवा, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, ताप, धाप लागणे, सर्दी अशी लक्षणे जाणवत असल्याचे समोर आले आहे. हाच धागा पकडून जिल्हा रुग्णालयातील जुन्या इमारतीतील कक्ष क्रमांक २३ मध्ये ही ओपीडी सुरू करण्यात आली आहे. सकाळी ९ ते दुपारी १२.३० पर्यंत येथे तपासणी होणार आहे. सुरुवातीला आरबीएसकेचे वैद्यकीय अधिकारी तपासणी करतील. त्यांच्या निदर्शनास गंभीर आजार असल्याचे जाणवताच रुग्णांना फिजिशियनकडे पाठविले जाणार आहे. त्यामुळे थोडाही त्रास जाणवल्यास या ओपीडीत येऊन तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी केले आहे.