रोहयोच्या पैशावर पोस्टमास्तरचा डल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:14 AM2018-11-17T00:14:36+5:302018-11-17T00:15:39+5:30

तालुक्यातील उदंड वडगाव येथे रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे करण्यात आली होती. २०१६ या वर्षात करण्यात आलेल्या बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली होती. त्यापैकी एकाच कामाचे अकुशल म्हणजे मजुरांचे पैसे दोन वेळेस उचलल्याचे उघड झाले आहे

The postmaster is scared of Roho's money! | रोहयोच्या पैशावर पोस्टमास्तरचा डल्ला !

रोहयोच्या पैशावर पोस्टमास्तरचा डल्ला !

Next
ठळक मुद्देउदंड वडगाव येथील प्रकार : मजुरांच्या खोट्या सह्या करून उचलले पैसे; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तालुक्यातील उदंड वडगाव येथे रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे करण्यात आली होती. २०१६ या वर्षात करण्यात आलेल्या बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली होती. त्यापैकी एकाच कामाचे अकुशल म्हणजे मजुरांचे पैसे दोन वेळेस उचलल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची तपासणी व चौकशी सुरु आहे. त्यामध्ये रोहयोच्या पैशावर येथील संबंधित पोस्ट मास्तरने डल्ला मारल्याचे समोर आले आहे.
बीड पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उदंड वडगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने बांधबंदिस्तिची कामे करण्यात आली होती. त्यापैकी २०१६ मधील मस्टर क्र. २५०९ व २८१९ याद्वारे एकाच कामाचे पैसे दोनवेळा उचलल्याचे उघड झाले. हा गैरप्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी बीडीओ पं.स. यांच्या स्तरावर संबंधित गावातील सरपंच, ग्रामरोजगार सेवक व मजुरांना नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये नमूद करण्यात आले होते की, आपण जर या गैरप्रकारात सहभागी असाल तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यानंतर संबंधित सरपंच, ग्रामरोजगारसेवक व मजुरांनी या करण्यात आलेल्या सह्या खोट्या असल्याचे लिहून दिले आहे. आमच्या परस्पर हा गैरप्रकार झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे तसेच नरेगा बीडीओ यांनी पोस्ट खात्यातील अधिकारी कर्मचाºयांची बैठक घेऊन, त्यांची झाडाझडती घेतली.
रोहयोंतर्गत काम करणाºया मजुरांचे पगार हे पोस्टाच्या व बँकेच्या माध्यमातून केले जातात. मात्र पोस्टामध्ये अनेक गैरप्रकार होत असून, मजुरांच्या व संबंधित ग्रामरोजगर सेवक व सरपंच यांच्या खोट्या सह्या करुन पैसे परस्पर उचलले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व पंचायत समिती सभापती कोकाटे यांनी देखील गटविकास अधिकाºयांकडे तक्रार दिली होती. हा गोरख धंदा करणाºया दलालांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हाभरात अनेक ठिकाणी रोहयो कामात गैरप्रकार होत असल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
मजुरांच्या नावे ९९ हजार २०० रुपये उचलले
उदंडवगाव येथील बांधबंदिस्तीच्या कामावर २०१६ मध्ये ४९ मजूर काम करत होते. त्यांचे पगार हे पोस्टाच्या माध्यमातून केले जात होते. मात्र, त्याच कामाचे २०१८ मध्ये बँकेत एफटीओ बनवण्यात आले व परत एकदा पैसे उचलले. हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी कारवाई झाली.
मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून तपासणी
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची तपासणी करण्याचे काम मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सुरु केले आहे. तसेच गैरप्रकार समोर आल्यानंतर कारवाई देखील करण्यात येत आहे. त्यामुळे रोहयोमध्ये भ्रष्टाचार केलेल्या अधिकाºयांसह दलालांना धडकी भरली आहे.

Web Title: The postmaster is scared of Roho's money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.