गावातच वीजनिर्मिती अन‌् तिथेच वापर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:50 AM2021-02-23T04:50:49+5:302021-02-23T04:50:49+5:30

कडा (ता. आष्टी, जि. बीड) : गावातच वीजनिर्मिती करून तिथेच त्याचा वापर करणे ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ...

Power generation in the village and use there only - A | गावातच वीजनिर्मिती अन‌् तिथेच वापर - A

गावातच वीजनिर्मिती अन‌् तिथेच वापर - A

Next

कडा (ता. आष्टी, जि. बीड) : गावातच वीजनिर्मिती करून तिथेच त्याचा वापर करणे ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आष्टी तालुक्यातील कडा येथे कार्यान्वित झाली. त्यामुळे कृषिपंपांना दिवसा विद्युतपुरवठा करणे शक्य होणार आहे.

शेतीला विद्युत मोटारीद्वारे वीजपुरवठा करणे हे महावितरण कंपनीसाठी मोठे आव्हानाचे काम असते. वीज उत्पादन ठराविक प्रमाणात होत असले, तरी त्याचा वापर मात्र समसमान नसतो. अनेकदा विजेची मागणी एवढी वाढते की विद्युत यंत्रणेवर मोठा ताण येतो. त्यासाठी भारनियमनासारखा पर्याय निवडावा लागतो. बऱ्याचदा शेतीला रात्री वीजपुरवठा करावा लागतो. त्यामुळे शेतकरी नाराज असतात; मात्र आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे कडा परिसरातील गावांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कडा येथील महावितरणच्या उपकेंद्राच्या जागेत सौरऊर्जा निर्माण करणारी यंत्रणा बसवण्यात आली असून, त्याद्वारे वीजनिर्मिती केली जाते. ४१६ किलो वॉट क्षमतेच्या या सौर वीजनिर्मिती प्रकल्पात दिवसभरात स्वच्छ सूर्यप्रकाश असताना साधारण १७०० युनिट थ्रीफेज वीज तयार होते. त्यावर कृषिपंप चालू शकतात, असे स्थानिक कनिष्ठ अभियंता डी. डी. दसपुते, सुरेश थोरात यांनी सांगितले. तर धानोरा येथेही लवकरच असा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती आष्टीचे उपअभियंता प्रवीण पवार यांनी दिली. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यापासून दिवसा विद्युतपुरवठा होत असल्याने शेतीला पाणी देणे सोपे झाल्याचे मेहेकरी येथील शेतकरी बाळासाहेब जगताप यांनी सांगितले.

Web Title: Power generation in the village and use there only - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.