थकबाकी न भरल्यामुळे मार्चपासून वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:12+5:302021-07-11T04:23:12+5:30

बीड शहर पथदिव्यांचा विद्युत पुरवठा चालू करण्याची मागणी अधीक्षक अभियंता र.गो. कोलप यांच्याकडे नगरसेवकांनी निवेदन देऊन केली. बीड : ...

Power outages since March due to non-payment of arrears | थकबाकी न भरल्यामुळे मार्चपासून वीज खंडित

थकबाकी न भरल्यामुळे मार्चपासून वीज खंडित

Next

बीड शहर पथदिव्यांचा विद्युत पुरवठा चालू करण्याची मागणी अधीक्षक अभियंता र.गो. कोलप यांच्याकडे नगरसेवकांनी निवेदन देऊन केली.

बीड : शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा महावितरण कंपनीने थकबाकी न भरल्यामुळे मागील मार्च महिन्यापासून खंडित केला आहे. हा विद्युत पुरवठा चालू करण्याची मागणी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी अधीक्षक अभियंता र.गो. कोलप यांच्याकडे केली. या संदर्भात नगरसेवकांनी कोलप यांना निवेदन दिले.

पथदिवे चालू करण्यासंदर्भात महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता र.गो. कोलप आणि नगरसेवकांमध्ये बैठक झाली. या बैठकीत बीड शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून देत, बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. येत्या तीन-चार दिवसांत बीड शहरातील बंद असलेले पथदिवे मीटर बसवून चालू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पथदिवे बंद असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महावितरण कार्यालयाच्या वतीने मीटर न बसवता, सरासरी विद्युत देयकाची आकारणी करून, नगरपालिका कार्यालयावर होणारा अन्याय थांबवावा. नगरपरिषद कार्यालयाने मार्च महिन्यात ५० लक्ष रकमेचा भरणा केला होता व तसेच ९ जुलै, २०२१ च्या पत्रकानुसार बीड नगरपालिका कार्यालय थकबाकीपोटी ५० लक्ष रुपये व चालू देयक भरणा करण्यास तयार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी विद्युत सभापती किशोर पिंगळे, पाणीपुरवठा सभापती सय्यद इलियास, सभापती भास्कर जाधव, नगरसेवक शेख मोहम्मद शेख खालेद, गणेश वाघमारे, रवींद्र कदम, गणेश तांदळे, भैय्यासाहेब मोरे, रंजीत बनसोडे, प्रभाकर पोकळे, संतोष गायकवाड उपस्थित होते.

100721\10bed_1_10072021_14.jpg

बंद पथदिवे

Web Title: Power outages since March due to non-payment of arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.