महिलांची ताकद क्रांती घडवू शकते -जयदत्त क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:59 PM2019-09-01T23:59:58+5:302019-09-02T00:01:18+5:30
महिलांमध्ये जागृती वाढली आहे महिला अधिक सक्षम होत आहे, महिलांची शक्ती क्रांती घडवू शकते हे आपण इतिहासामध्ये डोकावले तर स्पष्ट होईल, आता महाराष्ट्रात आणि बीड मध्ये इतिहास घडवायचा आहे त्या साठी महिलांनी देखील हातात धनुष्य घ्यावा असे आवाहान रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीड : महिलांमध्ये जागृती वाढली आहे महिला अधिक सक्षम होत आहे, महिलांची शक्ती क्रांती घडवू शकते हे आपण इतिहासामध्ये डोकावले तर स्पष्ट होईल, आता महाराष्ट्रात आणि बीड मध्ये इतिहास घडवायचा आहे त्या साठी महिलांनी देखील हातात धनुष्य घ्यावा असे आवाहान रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
शिवसेना महिला कार्यकारिणी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख कुडंलीक खांडे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्या दीपा क्षीरसागर, संगीता चव्हाण, आयोजक डॉ.सारिका क्षीरसागर, कमल बांगर, प्रमिला माळी, शुभांगी कुदळे यांच्यासह इतर प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होत्या.
या वेळी पुढे बोलताना रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले सणांचे दिवस असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती पाहता शिवसेनेला व्यापक रूप मिळत आहे, महिला ही संसाराचे एक चाक आहे, संसाराचा गाडा ओढण्यासाठी महिला बचत गट सक्षम होणे गरजेचे आहे. म्हणूनच बीड मध्ये शिवसेनेच्या वतीने महिला बचत गटांना ताकद देण्याचे काम सुरू आहे, शासनाच्या माध्यमातून मदत देण्याचे काम सुरू आहे. बीड शहरात जनतेच्या आरोग्यासाठी ३०० खाटाच्या शासकीय रुग्णालय लवकर उभे राहत आहे. शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.
व्यासपीठावर महिला आघाडीच्या पदाधिकारी सह, उपजिल्हाप्रमुख बंडू पिंगळे, वैजनाथ तांदळे, तालुका प्रमुख गोरख सिंगण, सुनील सुरवसे, दिलीप भोसले, किशोर पिंगळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ.सारिका क्षीरसागर यांनी केले हरितालिका सण असतानाही मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती विशेष होती.