एकता मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रभाकर साळेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:37+5:302021-01-23T04:34:37+5:30

साहित्यिक अनंत कराड यांच्या निवासस्थानी फाउंडेशनचे सचिव पत्रकार गोकुळ पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रा. डाॅ. भास्कर ...

Prabhakar Salegaonkar as the President of Ekta Marathi Sahitya Sammelan | एकता मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रभाकर साळेगावकर

एकता मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रभाकर साळेगावकर

Next

साहित्यिक अनंत कराड यांच्या निवासस्थानी फाउंडेशनचे सचिव पत्रकार गोकुळ पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रा. डाॅ. भास्कर बडे, लक्ष्मण खेडकर, दीपक महाले, राजेश बीडकर, कैलास तुपे, नितीन कैतके, रंजना फुंदे, मिरा दगडखैर, अ‍ॅड. भाग्यश्री ढाकणे, ज्ञानाई संगीत विद्यालयाचे प्राचार्य हरिप्रसाद गाडेकर, डाॅ. सचिन सानप, पो. काॅ. ज्ञानेश्वर पोकळे, लता बडे हे फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

संमेलनाची सुरुवात ग्रथदिंडीने होणार असून, यामध्ये रेणुका विद्यालय तसेच श्रीगुरू विरूपाक्ष शिवाचार्य महाराज महाविद्यालय, मानूर, दहिफळे वस्तीशाळा, केंद्रीय प्राथमिळ शाळा, मानूर, घाटशिळा माध्यमिक विद्यालय, पारगाव, प्रा. शा. बडेवाडी, प्रा. शा. बहिरवाडी, प्रा. शा. नागनाथनगर, प्रा. शा. जाटवड, प्रा. शा. हनुमानवाडी आणि परिसरातील सर्व शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यानंतर उद्घाटन समारंभ, महाराष्ट्राची लोकधारा आणि मुंबई येथील बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली 'लेखक आपल्या भेटीला' हे कार्यक्रम होतील.

सायंकाळी स्थानिक शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलेले आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांच्या अध्यक्षतेखालील परिसंवादाने होणार असून, तद्नंतर होणाऱ्या कथाकथन या सत्राचे अध्यक्ष प्रा. डाॅ. भास्कर बडे असणार आहेत. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि अहमदनगर येथील ज्येष्ठ कवी माधव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रभरातील निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

संमेलनासाठी शासनाने ठरवून दिलेले नियम पाळत महाराष्ट्रभरातील साहित्यिक आणि रसिकांची यावेळी उपस्थिती असणार आहे. त्यामुळे परिसरातील शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि साहित्य रसिकांनी या संमेलनाला हजर राहून लाभ घ्यावा, असे आवाहन एकता फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे.

Web Title: Prabhakar Salegaonkar as the President of Ekta Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.