प्रभु विश्वकर्मा मंदिराला सभागृह देणार- संदीप क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:38 AM2021-03-01T04:38:28+5:302021-03-01T04:38:28+5:30
बीड : शहरातील तळेगाव येथे २५ फेब्रुवारी रोजी सर्व समाजबांधवांच्यावतीने श्री प्रभु विश्वकर्मा जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ...
बीड : शहरातील तळेगाव येथे २५ फेब्रुवारी रोजी सर्व समाजबांधवांच्यावतीने श्री प्रभु विश्वकर्मा जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह नितीन धांडे व इतर मान्यवरांनी समाजाच्या विनंतीला मान देऊन भेट दिली. यावेळी श्री प्रभु विश्वकर्मा मंदिरासाठी आमदार निधीतून सभागृह तसेच मंदिराला येण्यासाठी रस्ता मंजूर करून लवकरच काम करणार असल्याचे आश्वासन आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिले.
शहरातील तळेगाव परिसरात असलेल्या श्री प्रभु विश्वकर्मा मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाच्या नियमांचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आ.संदीप क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे, सुरेश शेटे, लक्ष्मण ठाकूर, अशोक पिंगळे, सुग्रीव शिंदे, शिवाजी भोसले, मुकुंद डोरले, सदाशिव सुतार, अरूण पांचाळ, अशोक उनवणे, बापुराव भालेकर, बंडू घोलप, युवराज चौरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. क्षीरसागर म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समाजबांधवांनी प्रभु विश्वकर्माची जयंती उत्साहात आणि कोरोनाचे नियम पाळून साजरी केली. त्याबद्दल समाजबांधवांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पुढच्या जयंतीपर्यंत मंंदिराला मी आमदार निधीतून मंदिराच्या सभागृहासाठी निधीसोबतच रस्ता मंजूर करून काम ताबडतोब सुरू करणार आहे.
सकाळच्या सुमारास शरद महाराज डोळस (बेलुरेकर) यांच्या सुश्राव्य प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजबांधवांनी उपस्थिती लावून कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला.
===Photopath===
280221\28bed_7_28022021_14.jpg