राधा-गोविंद मंदिरात प्रभुपाद स्वामींचा अविर्भाव दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:05+5:302021-09-02T05:11:05+5:30
राधा-गोविंद मंदिरात प्रभुपाद स्वामींचा अविर्भाव दिन - A बीड : इस्कॉनतर्फे सावतामाळी चौक येथील राधा गोविंद मंदिरात श्रील प्रभुपाद ...
राधा-गोविंद मंदिरात प्रभुपाद स्वामींचा अविर्भाव दिन
- A
बीड : इस्कॉनतर्फे सावतामाळी चौक येथील राधा गोविंद मंदिरात श्रील प्रभुपाद स्वामी यांचा १२५ वा अविर्भाव दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. ‘हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे’ या मंत्राच्या जयघोषात हा सोहळा पार पडला. ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी अमेरिकेत जाऊन संपूर्ण जगामध्ये १०८ मंदिरांची स्थापना केली. आज या संस्थेत श्रील प्रभुपाद यांनी दिलेल्या शिकवणीनुसार भक्तगण भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करत आहेत. श्रील प्रभुपाद यांनी दिलेल्या शिकवणीनुसार कार्य करणारे सुमारे तीनशेहून अधिक भक्त बीड शहरामध्ये आहेत. मंगळवारी श्रील प्रभुपाद यांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करण्यात आला व त्यानंतर फुलांनी पुष्पाभिषेक करण्यात आला. श्रीपाद यांच्या जीवनावर भक्तांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण केल्याची माहिती इस्कॉन बीडचे प्रतिनिधी कृष्णनाम दास यांनी दिली.