प्रधानमंत्री योजनेतील घरांना जप्त वाळू देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:43 AM2019-04-27T00:43:04+5:302019-04-27T00:44:58+5:30
गेवराई तालुक्यातील राजापूर येथील सातभाई देवस्थानाच्या जमिनीवरील गट नंबर ७१ व ३९ मधील वाळू साठ्यावर बुधवारी कारवाई करत २५०० पेक्षाअधिक ब्रास वाळू जप्त केला होता. जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी ही सर्व वाळू बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व गेवराई येथील शासकीय विश्रामगृहात ठेवण्यात आली आहे.
बीड : गेवराई तालुक्यातील राजापूर येथील सातभाई देवस्थानाच्या जमिनीवरील गट नंबर ७१ व ३९ मधील वाळू साठ्यावर बुधवारी कारवाई करत २५०० पेक्षाअधिक ब्रास वाळू जप्त केला होता. जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी ही सर्व वाळू बीडजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व गेवराई येथील शासकीय विश्रामगृहात ठेवण्यात आली आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील माफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जप्त केलेली सर्व वाळू प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला.
गेवराई तालुक्यातील राजापूरप्रमाणेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील अशा साठ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. गोदावरी नदीपात्राला लागून असलेल्या ज्या परिसरात वाळूचे साठे केलेले आहेत. त्यांची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व वाळू माफियांवर एमपीडीए अंतर्गंत कारवाई करण्यात येणार आहे. अवैध वाहतूक कारणारे हायवा, टिप्पर, ट्रॅक्टरची माहिती गोपनीयरित्या जमा करुन ३ महिन्यानंतर सर्व वाहनांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जप्त केलेली ही सर्व वाळू ज्या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लागू झाले आहे, त्यांना दिली जाणार आहे.
ग्रामीण भागातील घरकुलांना मिळेल चालना
४जिल्हापरिषद व इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यांना ही जप्त केलेली वाळू देण्यात येणार आहे, यामुळे जिल्ह्यातील सर्व घरकुल योजनेला चालना मिळणार असून सामान्य नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे दिलासा मिळेल.
अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
४पोलीस व महसूल विभागातील ज्या अधिकारी कर्मचाºयाचे वाळू माफियांसोबत संबंध आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून त्यांना त्यांच्या मुळ पदावरुन हटवून इतर ठिकाणी पदभार दिला जाणार आहे. अधिकाºयांचे संबंध जर उघडकीस आले तर निलंबित केले जाणार आहेत.