बीड शहरात मान्सुनपुर्व स्वच्छता मोहिमेला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:44+5:302021-04-09T04:35:44+5:30
बीड : शहरामध्ये पालिकेच्या स्वच्छता विभागाने मान्सूनपुर्व स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख असलेले बारा नाल्यांची साफसफाई केली ...
बीड : शहरामध्ये पालिकेच्या स्वच्छता विभागाने मान्सूनपुर्व स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख असलेले बारा नाल्यांची साफसफाई केली जाणार असून शहरातील प्रमुख मार्गावरील छोटे-मोठे नाले देखिल साफ केले जाणार आहे. या कामाची पाहणी उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांनी करून मान्सूनपुर्व स्वच्छतेचे काम अधिक गतीने करून नियमित करण्यात येणारी स्वच्छता देखील चालू ठेवावी, अशा सूचना त्यांनी स्वच्छता विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
बीड शहरामध्ये मोठमोठे नाले असून ते तुंबलेल्या अवस्थेत आहेत. अचानक पाऊस पडल्यास या नाल्यांमधून पाणी जाणार नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेच्या स्वच्छता विभागाने आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या सूचनेवरून मान्सुनपुर्व स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेत पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने १२ नाले साफ केले जाणार आहेत. या १२ नाल्यांच्या साफसफाईनंतर शहरातील प्रमुख गल्ल्यांमध्ये छोटे-मोठे नाले देखिल साफ केले जाणार आहे. मान्सुनपुर्व स्वच्छता मोहिम शहरात चालू असून या स्वच्छता मोहिमेचे काम चांगल्या पद्धतीने केले जावे. त्यात कसलीही प्रकारची दिरंगाई होऊ नये यासाठी स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांनी स्वत: उभे राहून कामाची पाहणी करून स्वच्छता विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पालिकेच्या स्वच्छता विभागाने मान्सूनपुर्व स्वच्छता मोहिम हाती घेतल्याने शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी नगरसेवक, स्वच्छता निरीक्षकांची उपस्थिती होती.
===Photopath===
080421\082_bed_14_08042021_14.jpeg
===Caption===
मान्सूनपू्र्व कामांची पाहणी करताना उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर.