माजलगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात बेसुमार वृक्षतोड; मशीनचा वापर करत टोळीचा धुमाकुळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 03:51 PM2018-02-02T15:51:26+5:302018-02-02T15:52:35+5:30

तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला असलेले झाडे रातोरात तोडण्यात येत आहेत. अशी बेसुमार वृक्षतोड करणारी एक टोळीच सध्या या भागात कार्यरत आहे. या टोळीने पाञुड ते पारगाव ,लोणगाव ते आनंदगाव या रस्त्यालगतची वृक्ष तोडीचा सपाटाच लावला आहे.

Precious tree trunk in rural areas of Majalgaon taluka; The smok of the gang using the machine | माजलगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात बेसुमार वृक्षतोड; मशीनचा वापर करत टोळीचा धुमाकुळ

माजलगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात बेसुमार वृक्षतोड; मशीनचा वापर करत टोळीचा धुमाकुळ

googlenewsNext

माजलगाव ( बीड ) :  तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला असलेले झाडे रातोरात तोडण्यात येत आहेत. अशी बेसुमार वृक्षतोड करणारी एक टोळीच सध्या या भागात कार्यरत आहे. या टोळीने पाञुड ते पारगाव ,लोणगाव ते आनंदगाव या रस्त्यालगतची वृक्ष तोडीचा सपाटाच लावला आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यावरील कमी वर्दळीचा फायदा घेत तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेची अनेक वृक्ष रातोरात तोडण्यात येत आहेत. जवळपास दहा ते बारा जणांच्या टोळीकडून स्वयंचलित मशिनच्या सहाय्याने ही वृक्ष तोड करण्यात येते. रोज शेकडो वृक्षाची कत्तल केली बिनबोभाट सुरु आहे. यातुन ही टोळी मोठ्या प्रमाणावर माया कमवत आहे. तर दुसरीकडे वन विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यामुळे या तस्करांना रान मोकळे सुटले आहे. तसेच गावातील कोणी या प्रकाराला विरोध दर्शवला तर त्याला या टोळीकडून धमकावण्यात येते. 

यातच वन विभागाचे माजलगावचे कार्यालय धारुर येथे आहे.  तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ग्रामस्थ याची तक्रार कुठे करावी याच्या पेचात सापडले आहेत. 

Web Title: Precious tree trunk in rural areas of Majalgaon taluka; The smok of the gang using the machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.