लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; तीन केंद्रांवर सात महिलांनीच घेतला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:28+5:302021-07-20T04:23:28+5:30

बीड : गर्भवती महिलांना कोरोना लस लाभदायक आहे. याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. तरीही केवळ जनजागृती व माहितीच्या ...

Pregnant back to vaccination; Only seven women took the dose at the three centers | लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; तीन केंद्रांवर सात महिलांनीच घेतला डोस

लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; तीन केंद्रांवर सात महिलांनीच घेतला डोस

Next

बीड : गर्भवती महिलांना कोरोना लस लाभदायक आहे. याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. तरीही केवळ जनजागृती व माहितीच्या अभावामुळे तीन केंद्रांवर आतापर्यंत केवळ सात गर्भवतींनीच कोरोनाची लस घेतल्याचे समाेर आले आहे. गर्भवतींसह प्रसूती झालेल्या मातांनाही कोरोना लस सुरक्षित असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोना लसीला मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे. परंतु, शासनाकडून अपुरे डोस मिळत लसीकरणाची गती संथ आहे. त्यामुळे लोकांच्या केंद्रावर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागत आहेत. तसेच काही ठिकाणी तर दुपारीच डोस संपत असल्याने नागरिकांना रिकाम्या हातानेही परतावे लागत आहे. असे असतानाच आता गर्भवतींसह प्रसूती मातांना लस सुरक्षित असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. असे असले तरी याबाबत महिलांना माहिती पोहोचलेली नाही. आरोग्य विभागाकडून जनजागृती आणि विश्वास दिला जात नसल्याने गर्भवती महिला केंद्रावर येऊन लस घेण्यास अनुत्सुक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावरच सात गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. इतर एकाही केंद्रावर लस घेतली नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ही संख्या वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करून महिलांचे समुपदेशन करण्याची मागणी होत आहे.

दोन जिवांची मनात भीती

आरोग्य विभागाकडून लस सुरक्षित असल्याची माहितीच दिलेली नाही. त्यामुळे महिला पुढे येत नाहीत. त्यातच मातेसह गर्भातील बाळ, अशा दोन जिवांची भीती असल्याने अनेक महिला केंद्राकडे फिरकतच नसल्याचे दिसून येते.

---

आरोग्य विभागाकडून जनजागृतीसह समुपदेशन करण्यात येईल. बीड शहरातील तीन केंद्रांवर आतापर्यंत सात गर्भवती महिलांनी लस घेतल्याची नोंद आहे. ही लस गर्भवतींसह प्रसूती झालेल्या मातांना घेता येऊ शकते. लस सुरक्षित असून, गैरसमज टाळावेत.

डॉ. बाबासाहेब ढाकणे

---

अशी आहे आकडेवारी

जिल्हा रुग्णालय, बीड

पहिला डोस ३६१७५

दुसरा डोस १७८८७

गर्भवती महिला ७

---

मोमीनपुरा, बीड

पहिला डोस ३४३७

दुसरा डोस ४२६

गर्भवती महिला ००

----

पेठबीड

पहिला डोस ४३२६

दुसरा डोस ५०४

गर्भवती महिला ००

---

आतापर्यंतचे एकूण लसीकरण

६ पहिला डोस ५,०३,१६९

दुसरा डोस १,४६,१६०

एकूण लसीकरण ६,४९,३२९

Web Title: Pregnant back to vaccination; Only seven women took the dose at the three centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.