परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात स्फोट घडवण्याची होती तयारी; ३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 01:03 PM2022-08-28T13:03:47+5:302022-08-28T13:04:07+5:30

औष्णिक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी आणि इतर व्यक्तींपासून धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते.

Preparations were made for explosion in Parli thermal power station area; 3 people arrested | परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात स्फोट घडवण्याची होती तयारी; ३ जणांना अटक

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात स्फोट घडवण्याची होती तयारी; ३ जणांना अटक

googlenewsNext

बीड - बीड जिल्ह्यातील अतिसंवेदनशील परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून, बाहेर पडणाऱ्या राखेच्या ठिकाणी जिलेटिनद्वारे स्फोट घडवण्यासाठी आलेल्या तिघांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. या तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

औष्णिक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी आणि इतर व्यक्तींपासून धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते. मात्र गत दोन वर्षांपासून केंद्रातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची वाहतूक करण्यासाठी अनेक नियम धाब्यावर बसवले जातात. यामुळे औष्णिक वीज निर्मिती केंद्रास धोका निर्माण झाला आहे.

राख उपसा करणाऱ्या राख माफियांकडून औष्णिक वीज निर्मिती केंद्राजवळ स्फोट करून राख उपस्थित जात होती. याच दरम्यान 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी इथे स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले. आरोपींकडून जिलेटीनच्या 103 कांड्या, 150 तोटे, बॅटरी, वायर तसेच स्फोटाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Preparations were made for explosion in Parli thermal power station area; 3 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.