विकासासाठी कोणाचीही पायरी चढायला तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:49 PM2019-02-04T23:49:05+5:302019-02-04T23:50:09+5:30
नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौ-यावर येत आहेत.
बीड : नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौ-यावर येत आहेत. विरोधीपक्षात असलो तरी शहरात विकास कामे होण्यासाठी कोणाचीही पायरी चढायला आपण तयार असून होणाºया चर्चा निरर्थक असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते.
६ फेब्रुवारी रोजी बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६८ कोटी रुपयांची अमृत भूमिगत गटार योजना, ८८ कोटींच्या १६ डीपी रोडचा शुभारंभ, निवारागृह, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गंत ४४८ घरांची निर्मिती, न. प. सभागृहाचे स्व. गोपीनाथराव मुंडे नामकरण, जिल्हा रुग्णालयातील १०० खाटांचे शिशू व महिला विभागाची निर्मिती आदी कामांचा शुभारंभ व लोकार्पण होणार आहे. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आ.सुरेश धस, सतीश चव्हाण, विक्रम काळे, आर.टी. देखमुख, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी दिली.
यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शहरात या योजनेसह इतर ४०० कोटींची विकासकामे होणार आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत ठोस उपाययोजनांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीची नगरपरिषद असताना मुख्यमंत्र्यांना निमंत्रण तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर नाहीत या प्रश्नाला उत्तर देताना हा कार्यक्रम राजकीय नाही. नगर परिषद ही शहरातील नागरिकांची संस्था आहे. प्रोटोकॉलप्रमाणे बोलावलेल्या पाहूण्यांचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे. जेव्हा पक्षाचा कार्यक्रम असतो त्यावेळी आम्ही इतर नेत्यांचे फोटो टाकतो, असे ते म्हणाले. शहराच्या विकासासाठी आमच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी व भरीव निधी देण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना बोलावल्याचे नगराध्यक्ष यावेळी म्हणाले.
यांचा होणार सत्कार
पद्श्री डॉ.वामन केंद्रे व पद्मश्री शाब्बीर शेख तसेच कुस्तीपटू राहुल आवारे, क्रिकेटपटू सचिन धस यांचा नगरपरिषद, मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते स्वागत केले जाणार आहे.
विकासासाठी कोणाचीही पायरी चढायला तयार
भारतभूषण क्षीरसागर : होणाऱ्या चर्चेला अर्थ नाही, बीडसाठी मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी दिला
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौºयावर येत आहेत. विरोधीपक्षात असलो तरी शहरात विकास कामे होण्यासाठी कोणाचीही पायरी चढायला आपण तयार असून होणाºया चर्चा निरर्थक असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते.