येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारीला लागा - राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:38 AM2018-09-01T00:38:02+5:302018-09-01T00:39:29+5:30

Prepare for upcoming elections - Raj Thackeray | येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारीला लागा - राज ठाकरे

येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारीला लागा - राज ठाकरे

Next

बीड : पक्ष बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेमराठवाडा दौºयावर आहेत. शुक्रवारी ते बीड येथे आले होते. यावेळे येणाºया निवडणुकांसाठी तायरीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच गेवराई, केज, दिंद्रूड येथील विविध कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली.

विधानसभा, लोकसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत. या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागवे विकासासंदर्भांत पक्षाची धोरणे जास्ती, जास्त लोकांपर्यंत पोहचवावे. तसेच निवजणुकीच्या दृष्टीने पुढील रणनिती काय असावी याविषयी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. सकाळी ११ वाजता ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी भाजप सरकारला धारेवर धरले. तसेच पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे भाकीत देखील त्यांनी यावेळी वर्तवतले.
त्यानंतर ठाकरे केजकडे रवाना झाले. येथे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या राजगड संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. येथे ते म्हणाले की, काही ठिकाणी नवीन रस्ते झाले आहेत तर काही ठिकाणी खड्डे आहेत. त्यातून वाट काढत केज येथे उद्घाटनासाठी आलो आहे. नवरात्रीनंतर केज येथे जाहीर सभा घेऊन महाराष्ट्राच्या हिताचे विचार मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरे यांच्या हस्ते केज पंचायत समितीच्या शेतकरी भवनामध्ये तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियातील महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांशी संवाद साधून आस्थेने चौकशी केली.यावेळ राजू पाटील, अभिजित पानसरे, अनिल शिदोरे, जिल्हाध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाडे, वैभव् काकडे, शैलेश जाधव यांच्यासह मनसे महिला आघाडीच्या रेखा अंभुरे सह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेवराईत कार्यालयास भेट
राज ठाकरे हे औरंगाबाद वरून बीडकडे येत असताना, सकाळी १० वाजता गेवराई येथे शहरातील मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या राजगड कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार, गणेश पवार यांच्या सह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Prepare for upcoming elections - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.