गर्दीच्या धास्तीने लसीसाठी पैसे माेजण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:45+5:302021-07-15T04:23:45+5:30

बीड : कोरोना लसीचा जिल्ह्याला कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी होते. अनेकांना रिकाम्या ...

Preparing to pay for the vaccine out of fear of the crowd | गर्दीच्या धास्तीने लसीसाठी पैसे माेजण्याची तयारी

गर्दीच्या धास्तीने लसीसाठी पैसे माेजण्याची तयारी

Next

बीड : कोरोना लसीचा जिल्ह्याला कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी होते. अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. याच गर्दीच्या धास्तीने लोक लस घेण्यासाठी पैसे माेजण्याच्या तयारीत आहेत; परंतु खाजगीतील लसीकरणही लसीच्या पुरवठ्याअभावी बंद आहे. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे.

जिल्ह्यात १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस दिली जात आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार जवळपास २१ लाख लाभार्थी आहेत. या सर्वांना लस देण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन झालेले आहे; परंतु शासनाकडून जिल्ह्याला मुबलक लस मिळत नाही. प्रत्येक आठवड्याला सरासरी २० हजार लसीचे डोस प्राप्त होत आहेत. हा आकडा अतिशय तुटपुंजा आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची अपेक्षा असतानाही त्यांना लस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. असे असतानाही शासन स्तरावरून मुबलक लस उपलब्ध करून दिली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, लसीचा साठा उपलब्ध होताच केंद्रांवर लाभार्थ्यांची गर्दी होत आहे; परंतु त्यात ठरावीक लोकांनाच लस मिळते. इतरांना मात्र रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे काही लोकांची लसीसाठी पैसे माेजण्याचीही तयारी आहे; परंतु खाजगीमध्येही लस उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचीही अडचण झाली आहे. शासनाच्या केंद्रांनाच कमी लस मिळत असल्याने खाजगीत लस उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले. लसीचा साठा मुबलक उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

---

जिल्ह्यात ७३ शासकीय केंद्रांवर लसीकरण केले जाते. लसीच्या तुटवड्यामुळे खाजगीत लस दिली जात नाही. आतापर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त लोकांना लस दिली आहे. जशी लस उपलब्ध होईल, तसे वितरण केले जात आहे.

-डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर बीड

---

...अशी आहे आकडेवारी

हेल्थ केअर वर्कर्स

पहिला डोस 17,874

दुसरा डोस 11,181

--

फ्रंटलाइन वर्कर्स

पहिला डोस 33,832

दुसरा डोस 17,839

--

१८ ते ४४ वयोगट

पहिला डोस 1,11,406

दुसरा डोस 8,788

--

४५ ते ५९ वयोगट

पहिला डोस 1,28,270

दुसरा डोस 43,507

---

६० वर्षांवरील

पहिला डोस 1,81,304

दुसरा डोस 52,405

--

एकूण 6,06,406

पहिला डोस 4,72,686

दुसरा डोस 1,33,720

--

एकूण लसीकरण केंद्रे 73

--

प्रतिमहिना उपलब्ध होणारे सरासरी डोस 60 ते 70 हजार

Web Title: Preparing to pay for the vaccine out of fear of the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.