आष्टी तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:41+5:302021-06-30T04:21:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : तालुक्यात जूनच्या सुरुवातीला काही भागात पेरणी योग्य पाऊस झाला. तर काही भागात कमी प्रमाणात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यात जूनच्या सुरुवातीला काही भागात पेरणी योग्य पाऊस झाला. तर काही भागात कमी प्रमाणात झाला. पेरणी योग्य पाऊस नसतानाही शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. यानंतर पावसाने आठ, दहा दिवस ओढ दिल्याने पिके सुकू लागली होती. दुबार पेरणीचे संकट ओढावतो काय? अशी धास्ती शेतकऱ्यांना बसली होती. अशातच काही भागात दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी जूनच्या सुरूवातीस पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी उरकली. परंतु कोरोना महामारीचा सामना करीत शेतकऱ्यांनी हात उसनवारीने पैसे घेऊन पेरणी केली. मात्र पावसाने आठ ते दहा दिवस पावसाने पाठ फिरवल्याने पिके पिवळी पडू लागली. दुबार पेरणी करावी लागते की काय? या विवंचनेत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढग दाटून येत होते. मात्र पाऊस पडत नव्हता. मात्र दोन दिवसापासून उकाडा होत होता. हवा बंद व दमट वातावरण निर्माण होऊन दि.२७, २८ जून रोजी दुपारी पावसाच्या सरी बरसल्या. सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान पावसाने चांगलीच हजेरी लावली. आष्टी, टाकळसिंग, आष्टा, डोईठाण, पिंपळा, कडा, दौलावडगाव परिसरात पाऊस झाला.
....
शेतकरी बांधवांनो, पेरण्या उरकून घ्या
आष्टी तालुक्यात आतापर्यंत ६० ते ६५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यांना ही शेतकऱ्यांनी गती दिली आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना पेरणी करण्यास हरकत नाही. पेरणी योग्य पाऊस झाला असल्याने या आठवड्यात पूर्ण पेरण्या होतील. ज्या शेतकऱ्यांच्या वेळेवर पेरण्या झाल्या आहेत. त्यांनी आंतरमशागत व कीटकनाशक फवारणी करुन भरघोस उत्पन्न वाढीसाठी सतर्क रहावे.
- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.
...
पावसाने खरीप पिकांना दिलासा रविवार, सोमवारी झालेल्या खरीप पिकांना पावसाने दिलासा दिला आहे. तास ते दोन तास पावसानंतर संततधार सुरुच होती. तालुक्याच्या अनेक भागात दमदार पाऊस झाल्याने पिके पुन्हा तरारली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. तरीही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
-संतोष मुटकुळे, शेतकरी, मांडवा.
...
===Photopath===
290621\img-20210629-wa0341_14.jpg~290621\img-20210629-wa0338_14.jpg